शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदान जनजागृतीसाठी सिने कलावंतांची मदत घेतली जाईल - सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

By सुमेध वाघमार | Updated: August 26, 2023 18:17 IST

मेडिकलमध्ये नेत्रदान पंधरवडाचा शुभारंभ

नागपूर : कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये, आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करायला हवे. परंतु गैरसमजामुळे नेत्रदान होत नाही. यामुळे जनजागृतीची मोठी गरज आहे. यासाठी सिने कलावंतांची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्यावतीने आयोजित ‘नेत्रदान पंधरवडा’चा शुभारंभ शनिवारी झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, नेत्ररोग विभागाचा प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे, माजी विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. गजभिये यांनी केले. या प्रसंगी डॉ. अतुल राजकोंडावार, डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. सिंगाडे, डॉ. कविता धाबर्डे, डॉ. निलेश गादेवार, डॉ. पियूष मदान, डॉ. मुरारी सिंग आदी उपस्थित होते. संचालन डॉ. शिवानी साडंगी व डॉ. आयुषी डागा यांनी केले तर आभार डॉ. मिनु चौधरी यांनी मानले.   -‘रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थाल्मोलॉजी’साठी प्रयत्न 

मेडिकलच्या नेत्ररोग विभागात येणाºया रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावे, नेत्ररोगाशी संबंधित विविध आजारावर संशोधन व्हावे यासाठी ‘रिजनल इन्स्टिट्यूट ऑॅफ ऑप्थाल्मोलॉजी’ गरजेचे आहे. यासाठी मेडिकलने तसा प्रस्ताव तयार करून द्यावा. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना स्वत: भेटून इन्स्टिट्यूटसाठी प्रयत्न केले जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

- मानवतेच्या हितासाठी कार्य करा, सर्वांनी नेत्रदान करा

‘नेत्रदान श्रेष्ठ दान’, ‘मानवतेच्या हितासाठी कार्य करा, सर्वांनी नेत्रदान करा’ असे आवाहन करणारे फलक हाती घेऊन मेडिकल व नर्सिंग कॉलेजच्या ५०० विद्यार्थ्यांनी शहरात नेत्रदान जनजागृती रॅली काढली. त्यापूर्वी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. डॉ. अशोक मदान व डॉ मिनल व्यवहारे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. रॅलीमध्ये मेडिकलचे एनसीसीचे विद्यार्थी, परिचारिका, कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Healthआरोग्यSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारnagpurनागपूर