शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोशल मीडियावर सेनेसाठी मदतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 23:57 IST

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेनेला मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सिंडीकेट बँकेत आर्मी वेलफेअर फंड नावाने हे खाते असून, अभिनेते अक्षयकुमार यांच्या सूचनांवर पंतप्रधानांनी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख मॅसेजमध्ये आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक गोष्टींची सत्यता नसल्यामुळे सेनेला मदत करण्यास इच्छुक असणाऱ्या नागपूरकरांनी यावर संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी लोकमतकडे सुद्धा विचारणा केली. बँकेमध्येही यासंदर्भात काही लोक विचारणा करीत आहेत. प्रशासनाने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावा, अशी मदत करू इच्छिणाऱ्यांची मागणी आहे.

ठळक मुद्देमदत करणाऱ्यांमध्ये संभ्रमलोकमतकडे आणि बँकेतही वाढली चौकशी, प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेनेला मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सिंडीकेट बँकेत आर्मी वेलफेअर फंड नावाने हे खाते असून, अभिनेते अक्षयकुमार यांच्या सूचनांवर पंतप्रधानांनी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख मॅसेजमध्ये आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक गोष्टींची सत्यता नसल्यामुळे सेनेला मदत करण्यास इच्छुक असणाऱ्या नागपूरकरांनी यावर संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी लोकमतकडे सुद्धा विचारणा केली. बँकेमध्येही यासंदर्भात काही लोक विचारणा करीत आहेत. प्रशासनाने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावा, अशी मदत करू इच्छिणाऱ्यांची मागणी आहे.सोशल मीडियावरील मॅसेजमध्ये मोदी सरकारने कालच्या कॅबिनेटच्या बैठकीत भारतीय सेनेच्या जवानांसाठी जे युद्धात जखमी होतात अथवा शहीद होतात, त्यांच्या मदतीसाठी बँक अकाऊंट सुरू केले आहे. त्यात कुणीही स्वच्छेनुसार कितीही दान करू शकतात. अक्षयकुमारच्या मास्टर प्लॅननुसार देशाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास ७० टक्के भारतीयांनी १ रुपया रोज दान केला तर एका दिवसात १०० कोटी जमा होतात, तर वर्षभरात ३६,००० कोटी जमा होऊ शकतात. एवढे पाकिस्तानचे वार्षिक संरक्षणाचे बजेटही नसल्याचा उल्लेख मॅसेजमध्ये आहे. मॅसेजमध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक, अकाऊंट नंबर, आयएफएससी कोड व पत्तासुद्धा दिला आहे.पुलवामाच्या घटनेनंतर हा मॅसेज वेगाने व्हायरल होत असून, यासंदर्भात मोदी सरकारने केव्हा कॅबिनेट बैठक घेतली, कधी घोषणा केली, यासंदर्भात कुठलीही माहिती जनतेकडे नाही. शिवाय या मॅसेजच्या विरोधातही संदेश व्हायरल झाले आहेत. सेनेच्या नावावर जनतेला ठगविण्याचा फंडा, सोशल मीडियावर मागितले जाताहेत पैसे, अशा आशयाचे हे मॅसेज आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम आहे. ज्यांना सेनेबद्दल खरोखरच आपुलकी आहे, जे पैसे देण्यास तयारही आहेत पण आपली फसवणूक तर होणार नाही, याची भीती त्यांच्यात आहे. अशा काही लोकांनी शनिवारी लोकमतमध्ये संपर्क साधला. काहींनी बँकेतही विचारणा केली.बँकेचे अधिकारी काय म्हणतात?यासंदर्भात सिंडीकेट बॅँकेच्या नागपुरातील मुख्य शाखेत विचारणा केली असता, तेथील बँक मॅनेजर यांनी सांगितले की, सेनेच्या मदतीसाठी २०१६ मध्येच आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टी नावाने खाते काढण्यात आले होते. पुलवामाच्या घटनेनंतर सरकारने हा निर्णय घेतला नाही. आमच्याकडेही काही जणांंनी विचारणा केली आहे. त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी पैसे डिपॉझिटही केले आहेत. यावेळी त्यांनी खातेक्रमांक ९०५५२०१०१६९१५ हा असल्याचे सांगितले. बँकेचा आयएफएससी कोड एसवायएनबी०००९०५५ असल्याचे सांगितले.कधी उघडले होते खाते ?३ फेब्रुवारी २०१६ मध्ये सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात १० जवानांचा मृत्यू झाला होता, तेव्हा काही लोक मदतीसाठी पुढे आले होते. त्यावेळी सरकारने आर्मी वेलफेअर फंड नावाने सिंडीकेट बँकेत खाते उघडले होते. पण याबद्दल अपेक्षित जनजागृती करण्यात आली नव्हती. त्यामुळे आर्मी वेलफेअर फंडाच्यासंदर्भात संभ्रमच आहे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाfundsनिधी