मृत काेराेना याेद्धाच्या कुटुंबाला मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:10 IST2021-04-23T04:10:03+5:302021-04-23T04:10:03+5:30

वाडी : नगर परिषदेत कार्यरत कर्मचारी काेराेना याेद्धा संदीप अढाऊ यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे अढाऊ ...

Help for the family of the deceased Kareena Yadav | मृत काेराेना याेद्धाच्या कुटुंबाला मदतीची मागणी

मृत काेराेना याेद्धाच्या कुटुंबाला मदतीची मागणी

वाडी : नगर परिषदेत कार्यरत कर्मचारी काेराेना याेद्धा संदीप अढाऊ यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे अढाऊ कुटुंबावर माेठा आघात झाला आहे. मृताच्या कुटुंबाला शासनाने ५० लाखाची मदत करावी, अशी मागणी नगर परिषद कर्मचारी संघटनेने केली आहे.

दत्तवाडी गजानन साेसायटीतील रहिवासी असलेले संदीप शालिग्राम अढाऊ (४९) यांच्याकडे काॅन्टॅक्ट ट्रेसिंगअंतर्गत काेराेनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम हाेते. हे काम करीत असताना तेही बाधित झाले आणि बुधवारी (दि.२१) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आराेप कर्मचारी संघटनेने केला आहे. मृत संदीप अढाऊ यांच्या कुटुंबाला शासनाने ५० लाख रुपयाची मदत द्यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रमेश इखनकर, उपाध्यक्ष लक्ष्मण ढाेरे व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Help for the family of the deceased Kareena Yadav