शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या  : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 20:57 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जी मदत जाहीर करण्यात आली ती अत्यंत कमी आहे. यातून शेतकऱ्यांचा साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत करावी, या मागणीचे राज्यपालांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत आ.अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिले.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जी मदत जाहीर करण्यात आली ती अत्यंत कमी आहे. यातून शेतकऱ्यांचा साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत करावी, या मागणीचे राज्यपालांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत आ.अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिले.ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, धान, संत्रा व मोसंबी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी व शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. यावेळी आम्हाला भरीव मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली होती.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नागपूर जिल्ह्यात केवळ १३ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेता देण्यात आलेली मदत ही अत्यंत कमी आहे. राज्य सरकारच्यावतीने राज्यपालांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त पिकांसाठी ८ हजार रुपये प्रति हेक्टर व फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरपर्यंत मदत जाहीर करण्यात आली. परंतु ही मदत कमी आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी केली आहे.त्याच धर्तीवर राज्यपालांनीसुद्धा केंद्राकडे अशी मागणी करावी, असेसुद्धा अनिल देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी अनिल देशमुख यांच्यासोबत आ. प्रकाश गजभिये, राहुल देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, बंडोपंत उमरकर, सतीश शिंदे, ईश्वर बाळबुधे, बाबा शेळके, उज्ज्वला बोढारे, राजू राऊत, किशोर चौधरी, अविनाश गोतमारे, किशोर बेलसरे, दीपक मोहिते,अनिल साठवणे, नंदलाल मोवाडे, गणेश पानतावणे, मनीष फुके, रुद्रांगण चव्हाण, उदयन बन्सोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.बँकांनी कपात करू नयेजी काही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते ती मदत बँका परस्पर खात्यातून कापून घेतात. यामुळे मदत मिळून सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी बँक ज्या पद्धतीने खात्यातून पैसे कपात करतात ते सुद्धा करण्यात येऊ नये, अशी मागणीसुद्धा यावेळी अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना केली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी