पार्किंगला विरोध करणाऱ्यावर हेल्मेटने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:11 IST2020-12-05T04:11:29+5:302020-12-05T04:11:29+5:30

नागपूर : घरासमोर वाहन उभे करण्यास विरोध केला म्हणून दुचाकी चालकाने विरोध करणाऱ्याच्या डोक्यावर हेल्मेटने हल्ला करून त्याला गंभीर ...

Helmet attack on parking opponent | पार्किंगला विरोध करणाऱ्यावर हेल्मेटने हल्ला

पार्किंगला विरोध करणाऱ्यावर हेल्मेटने हल्ला

नागपूर : घरासमोर वाहन उभे करण्यास विरोध केला म्हणून दुचाकी चालकाने विरोध करणाऱ्याच्या डोक्यावर हेल्मेटने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुकेश काशीराम वराडे २९ नोव्हेंबरला दुपारी ४.३० वाजता आपल्या घरी असताना आरोपी वर्धमान चंपकलाल रायसोने हा तिथे दुचाकी घेऊन आला. तो घरासमोर गाडी ठेवत असल्यामुळे वराडे यांनी विरोध केला. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपी रायसोने याने वराडेवर हेल्मेटने हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर तसेच कानावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. बाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपीला आवरले. वराडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी आरोपी वर्धमान रायसोनेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---

Web Title: Helmet attack on parking opponent