शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृताच्या वारसदाराला मिळणार पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:17 IST

नवीन कायद्याप्रमाणे आता मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख तर अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळेल.

ठळक मुद्देथर्ड पार्टी वाहन विमा हिताचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरातील कमावत्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबावर गंभीर संकट कोसळते. पूर्वी ‘थर्ड पार्टी’ वाहन विम्यानुसार मृताच्या वारसदारला ५० हजार तर अपंगत्व आल्यास २५ हजार रुपयांची तरतूद होती. परंतु नवीन कायद्याप्रमाणे आता मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख तर अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळेल.या नवीन कायद्याची माहिती देताना अ‍ॅड. पी. एस. मिराचे म्हणाले, भारत सरकारने मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये सुधारणा केली आहे. आता २०१९ नुसार ‘थर्ड पार्टी’संबंधी नुकसान भरपाई कलम १६४ प्रमाणे पाच लाख तर जखमी किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तीला अडीच लाख रुपये मिळेल. हा ‘क्लेम’ मिळण्यासाठी अर्जदाराने अपघातात दोष सिद्ध करायची आवश्यकता नाही. परंतु वाहन समाविष्ट व उपयोगात होते हे सिद्ध करण्याची गरज आहे. नव्या कायद्याप्रमाणे अपघात झाल्यापासून सहा महिन्याच्या आत ‘क्लेम’ करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, जुन्या कायद्यात अपघातानंतर वाहन न मिळाल्यास म्हणजे ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणामध्ये मृताच्या वारसांना २५ हजार व गंभीर जखमीला १२ हजार रुपयांची तरतूद होती. मात्र नव्या कायद्यानुसार मृताच्या वारसांना दोन लाख तर गंभीर जखमींना ५० हजार रुपये मिळणार आहे. नवा ‘थर्ड पार्टी’ वाहन विमा कायदा हिताचा आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर