कारचालकाचा हैदोस

By Admin | Updated: July 23, 2014 00:58 IST2014-07-23T00:58:37+5:302014-07-23T00:58:37+5:30

बेदरकार कारचालकाने आज सायंकाळी संगम टॉकीज परिसरात हैदोस घातला. निष्काळजीपणे कार चालवून चालकाने तीन ते चार दुचाक्यांना धडक मारली. त्यामुळे तिघे जबर जखमी झाले.

Hedos of the carpenter | कारचालकाचा हैदोस

कारचालकाचा हैदोस

दुचाक्यांना धडक : तिघे जबर जखमी
नागपूर : बेदरकार कारचालकाने आज सायंकाळी संगम टॉकीज परिसरात हैदोस घातला. निष्काळजीपणे कार चालवून चालकाने तीन ते चार दुचाक्यांना धडक मारली. त्यामुळे तिघे जबर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
ग्रे कलरची हुंदेई कंपनीची भरधाव कार सक्करदऱ्यातून संगम टॉकीजकडे आली. प्रारंभी कारचालकाने एका तरुणाच्या दुचाकीला कट मारला. त्यानंतर पांढऱ्या माईस्ट्रो दुचाकीला (एमएच ३२/ एक्स ५४०५) आणि नंतर होंडा शाईनला धडक मारली. माईस्ट्रोच्या समोरच्या भागाची पुरती मोडतोड झाली आणि चालकाला गंभीर दुखापत झाली. होंडा शाईनचालकाचा पाय जायबंदी झाला.
अपघातानंतर भरपावसात आरोपी कारचालक बेदरकारपणे पुढे जात होता. त्याचा काही दुचाकीचालकांनी पाठलागही केला. मात्र, तो आयसीआयसीआय बँकेसमोरून शिवनगरकडे पळून गेला. नागरिकांनी पावसाची पर्वा न करता जखमींना जवळच्या खासगी इस्पितळात नेले. पोलिसांनाही कळविले. वृत्त लिहिस्तोवर जखमींची नावे आणि आरोपी कारचालकाचा नंबर पोलिसांकडून कळू शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Hedos of the carpenter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.