शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पावसाचे थैमान; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 14:52 IST

विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

नागपूर : जिल्ह्यातील दारे नसलेले एकूण १४ धरणे ओव्हर फ्लो झाले आहेत. तर, चार  धरणाची दारे उघडण्यात आली आहे. एकूण लहान व मोठ्या १८ धरणांतून विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी परिसरात रविवारी नाल्याचा पूर ओलांडताना आई व मुलगी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. तर, मंगळवारी सावनेर तालुक्यात पुरात गाडी वाहून गेल्याने ६ जणांना जलसमाधी मिळाली. संततधार पावसामुळे नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा नदीला पूर, अनेक रस्ते बंद, वाहतूक प्रभावित. राजुरा व कोरपना तालुक्यातील अनेक मार्ग बंद. इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

गोंदिया : जिल्ह्यातील आठही तालुक्यात अतिवृष्टी. आमगाव तालुक्यातील गिरोला सिंधीटोला पांगोली नदीवरील कच्चा पूल वाहून गेल्याने या गावांचा आमगाव तालुक्याशी संपर्क तुटला.

भंडारा : जिल्ह्यात २४ तासांत जोरदार पाऊस. २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद.  गोसेखुर्द प्रकल्पाचे २८ गेट उघडले, ५ गेट एक मीटरने, तर २३ गेट अर्धा मीटरने उघडले, ४०९०.७ क्युमेक पाण्याचा विसर्ग. पवनी - बोरगाव रस्त्यावरील नाल्याच्या पुराचे पाणी पुलावर, सकाळपासून वाहतूक ठप्प. मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथे शेतात वीज कोसळून तरुण ठार. बुधवारी सकाळी ८.१५ वाजताची घटना. शुभम विजय लेंडे (२४) रा. मोहगाव देवी असे मृताचे नाव.

गडचिरोली : तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा प्रकल्पाचे (लक्ष्मी बॅरेज) सर्व ८५ गेट उघडले, १२,१०,६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, सिरोंचा तालुक्यातील शेती आणि गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. 

नदी-नाल्यावरील पूल ठरताहेत धोकादायक

पुलावरून पाणी जात असल्याचे दिसत असतानाही अनेकजण तो ओलांडण्याचा प्रयत्न करतात. चालक अतिआत्मविश्वासाने गाडी नेण्याचा प्रयत्न करतात. गाडीच्या चाकांमध्ये उच्च दाबाची हवा असते. दीड फुटावर गाडी जाताच ती तरंगू लागते व पुलाखाली फेकली जाते. त्यामुळे अशावेळी पूल ओलांडण्याचे धाडस करण्यापेक्षा पाणी ओसरण्याची वाट पाहिलेले बरे. 

टॅग्स :RainपाऊसfloodपूरVidarbhaविदर्भGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प