जोरदार पावसाने उडाली दाणादाण()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST2021-09-03T04:08:33+5:302021-09-03T04:08:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नागपूरसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्ध्या-एक तासात शहरातील ...

Heavy rain blows grain () | जोरदार पावसाने उडाली दाणादाण()

जोरदार पावसाने उडाली दाणादाण()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नागपूरसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्ध्या-एक तासात शहरातील चौकाचौकात, रस्त्यावर व काही वस्त्यात पाणी साचल्याने नागरिकांची दाणादाण उडाली.

गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या सरी आल्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्ध्या तासाच्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले होते. तसेच सखल भागांत असलेल्या सोसायटी आणि घरांतही पावसाचे पाणी साचले साचले. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. परंतु अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या.

सिव्हील लाईन, रामदासपेठ, धरमपेठ, शंकरनगर, अजनी, वर्धा रोड, शिवाजी नगरसह अनेक भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने कार्यालयातून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मनपा मुख्यालयातील बगिचाच्या बाजूला दीड फूट पाणी साचले होते. बालभारती कार्यालयासमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी होते. महाराजबाग रोड, अजनी रोडवर काही ठिकाणी अशीच परिस्थिती होती.

सिमेंट रस्ते उंच केल्याने लगतच्या वस्त्यात पाणी साचण्याचे प्रकार वाढले आहे. पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा न काढल्याने पाणी साचत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

स्थानिक नगरसेवकांचे लक्षच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी साचण्याच्या घटनामुळे स्थानिक नागरिकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांवर टीका केली आहे

Web Title: Heavy rain blows grain ()