शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भीषण उष्णतेत विजेचा फटका : गोरेवाडा सबस्टेशनचे सात फिडर खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:14 IST

शहरात तांत्रिक त्रुटीमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. यातच शनिवारी गोरेवाडा येथील ३३ केव्ही सबस्टेशनशी जुळलेले सात फिडर ठप्प पडले. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार सातपैकी चार फिडर लगेच दुरुस्त करण्यात आले. परंतु तीन फिडरचे अंडरग्राऊंड केबल खराब झाल्यामुळे वेळ लागला. परंतु याचा फटका नागरिकांना बसला. भीषण उष्णतेत पश्चिम नागपुरातील हजारो लोकांंना सहा तास विजेविना राहावे लागले.

ठळक मुद्देपश्चिम नागपुरातील नागरिक सहा तास विजेविना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात तांत्रिक त्रुटीमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. यातच शनिवारी गोरेवाडा येथील ३३ केव्ही सबस्टेशनशी जुळलेले सात फिडर ठप्प पडले. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार सातपैकी चार फिडर लगेच दुरुस्त करण्यात आले. परंतु तीन फिडरचे अंडरग्राऊंड केबल खराब झाल्यामुळे वेळ लागला. परंतु याचा फटका नागरिकांना बसला. भीषण उष्णतेत पश्चिम नागपुरातील हजारो लोकांंना सहा तास विजेविना राहावे लागले.वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलनुसार जवळपास चार हजार वीज ग्राहकांची वीज गायब होती. यापूर्वी पश्चिम नागपुरातील अनेक भागांमध्ये तांत्रिक त्रुटींमुळे सकाळी ११ वाजेपासून विजेचा लपंडाव सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाडा, एकतानगर, बोरगाव, बरडे ले-आऊट, केटीनगर, फ्रेण्ड्स कॉलनीपासून गिट्टीखदानपर्यंत तर अनंतनगरपासून झिंगाबाई टाकळीपर्यंतच्या परिसरातील वीज गेली. काही भागांना दुसऱ्या फिडरवरून जोडून पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात विजेचे येणे-जाणे सुरू होते. सायंकाळी ६ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. म्हणजेच भीषण उष्णतेत सकाळी ११ पासून तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना राहावे लागले. वीज गेल्याबाबत एसएनडीएल कार्यालयात फोन केल्यावर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचाही अनेकांनी आरोप केला आहे.

 

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन