धंतोलीत दोन गटात जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:07 IST2021-04-02T04:07:46+5:302021-04-02T04:07:46+5:30

महेश रामू निसाद हा धंतोलीतील राहुलनगरात राहतो. त्याच्यासोबत बुधवारी रात्री कार्तिक ऊर्फ काल्या येलपुलवार (वय २१), प्रफुल्ल फुलचंद पाटील ...

Heavy fighting between two groups in Dhantoli | धंतोलीत दोन गटात जोरदार हाणामारी

धंतोलीत दोन गटात जोरदार हाणामारी

महेश रामू निसाद हा धंतोलीतील राहुलनगरात राहतो. त्याच्यासोबत बुधवारी रात्री कार्तिक ऊर्फ काल्या येलपुलवार (वय २१), प्रफुल्ल फुलचंद पाटील (वय २०), वैभव निगुट, वैभव शेंडे आणि काैस्तुभ पांडे यांनी वाद घालून निसादला बेदम मारहाण केली. नाल्यावर सुरू असलेली ही मारहाण पाहून निसादच्या मदतीला प्रेमलाल संतराम शाहू (वय ३६) , हेमलाल शाहू आणि रमेश निसाद गेले असता आरोपींनी त्यांच्यावरही लाठी आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवून त्यांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात हे चाैघेही जबर जखमी झाले. हेमलालची प्रकृती गंभीर झाल्याचे पाहून राजेश ऊर्फ रसेल निसाद, अक्षय धुर्वे आणि प्रेमलाल संतराम शाहू यांनी काल्या येलपुलवार तसेच प्रफुल्ल फुलचंद पाटील या दोघांवर हल्ला चढवून त्यांना जबर जखमी केले. हाणामारीच्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळाल्यानंतर धंतोली पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. काल्या येलपुलवार आणि पाटीलला अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: Heavy fighting between two groups in Dhantoli