Maharashtra Election 2019; उपराजधानीत गडकरी वाड्यावरील निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वीचा हृद्य क्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 14:41 IST2019-10-04T14:36:14+5:302019-10-04T14:41:27+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या उमेदवारांना कांचन गडकरी यांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

Maharashtra Election 2019; उपराजधानीत गडकरी वाड्यावरील निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वीचा हृद्य क्षण
ठळक मुद्देगडकरी यांच्या निवासस्थानी केले औक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या उमेदवारांना कांचन गडकरी यांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची व कार्यकर्त्यांची मांदियाळी जमली होती. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील, सुधीर पारवे, मोहन मते, चंद्रशेखर बावनकुळे, सुलेखा कुंभारे आदी उपस्थित होते. कांचनताई गडकरी यांनी सर्व उमेदवारांचे औक्षण करून त्यांना भावी आयुष्यासाठी व विजयासाठी शुभेच्छा दिल्या.