शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

कळमना स्टेशनवर घडली हृदयस्पर्शी घटना – आरपीएफच्या तत्परतेने झाली आई–मुलाची पुनर्भेट

By नरेश डोंगरे | Updated: June 16, 2025 19:50 IST

हातात पाण्याची बाटली अन् डोळ्यात गंगाजमूना : अहमदाबाद सुपरफास्टमध्ये 'रामपूर का लक्ष्मण'

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोटच्या चिमुकल्याला कोचमध्ये ठेवून आई फलाटावरच्या नळावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी आली. बाटली भरेपर्यंत गाडी सुटली अन् चिमकल्याची त्याच्या आईसोबत ताटातूट झाली. तो तिकडे आणि ही ईकडे, दोघेही कावरेबावरे होऊन रडू लागले. त्यांची अवस्था बघून रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) अॅक्शन मोडवर आले अन् तासा-दोन तासातच चिमुकला आईच्या कुशित पोहचला. दोन दिवसांपूर्वी कळमना रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना आज उघड करण्यात आली.

अहमदाबाद सुपरफास्ट ट्रेनच्या जनरल कोचमध्ये बसून निरूपमा (नाव काल्पनिक) ही महिला नागपूर येथे येण्यासाठी निघाली होती. तीन वर्षीय चिमुकला तिच्या सोबत होता. दुपारी २.२५ वाजता गाडी कळमना रेल्वे स्थानकावर थांबली. महिलेने चिमुकल्याला सहप्रवाशांच्या हवाली करून पाण्याची बाटली भरण्यासाठी फलाटावरच्या नळाकडे धाव घेतली. ती बाटलीत पिण्याचे पाणी भरत असतानाच गाडी सुटली. त्यामुळे तिने फलाटावर तर तिकडे कोचमध्ये तिच्या चिमुकल्याने आकांत सुरू केला. फलाटावरच्या आरपीएफच्या जवानांच्या लक्षात झालेला प्रकार येताच त्यांनी लगेच नागपूर कंट्रोलला कॉल दिला. त्यानुसार, गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचताच चिमुकल्याचा शोध घेऊन आरपीएफच्या जवानांनी त्याला आरपीएफच्या चाैकीत आणले. चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना बोलवून घेण्यात आले. आई दुरावल्याची जाणीव झाल्याने चिमुकला आक्रोश करीत होता. हरसंभव प्रयत्न करूनही तो शांत होत नव्हता. दरम्यान, त्याच्या आईलाही चिमुकला सुखरूप असल्याचा फोनवरून निरोप देऊन आरपीएफ चाैकीत येण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, चिमुकल्याची आई आणि आजोबा तेथे पोहचले. आईला बघताच चिमुकला तिला बिलगला. काळजाचा तुकडा दूर झाल्यामुळे तास-दोन तासांपासून माऊलीही अस्वस्थ होती. तो कुशित येताच तिने त्याच्यावर मायेचा वर्षाव करतानाच अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली.

महिनाभरात दुसरी घटनागेल्या १९ मे रोजी अशीच एक घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली होती. कर्मभूमी एक्सप्रेसमध्येही आपल्या दोन मुलांना घेऊन नागपूरकडे एक महिला येत होती. गोंदिया स्थानकावर पिण्याचे पाणी घेताना गाडी सुटली. ती फलाटावर तर तिचे राम आणि शाम ट्रेनमध्ये राहून गेले होते. त्यावेळीदेखिल आरपीएफने तत्परता दाखवत तिच्या मुलांना नागपूर स्थानकावर उतरवून घेतले आणि नंतर आईच्या हवाली केले होते.

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर