शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
4
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
5
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
6
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
7
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
8
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
9
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
10
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
11
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
12
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
13
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
16
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
17
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
18
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
19
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
20
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभर आधीच कळतो हार्ट अटॅक; लक्षणे समजणे महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:09 IST

Nagpur : सुरुवातीचे ६ तास महत्त्वाचे

डॉ. नागेश वाघमारेनागपूर : हार्ट अटॅक येण्याआधी रुग्णांना स्वतःमध्ये जाणवणारे बदल सूक्ष्म असू शकतात. उदा. रोजचे काम करताना किंचित थकवा जाणवणे, इमारतीच्या नेहमीच्या मजल्यावर चढताना श्वास लागणे, चालताना दोन्ही हातांमध्ये जडपणा जाणवणे, किरकोळ कामे करताना गळा दाटल्यासारखा वाटणे, किराणा सामान उचलताना किंवा स्वच्छता करताना छातीत जडपणा, थोडी घुसमट, घाम येणे, चक्कर येणे इत्यादी लक्षणे काही क्षण थांबल्यावर आपोआप कमी होतात.

काही रुग्णांना जेवणानंतर छातीत अडकल्यासारखे वाटते. थोडीशी घुसमटही जाणवते, जी १० ते १५ मिनिटांपर्यंत असते. बऱ्याच वेळा आपण या लक्षणांचे कारण अॅसिडिटी, थकवा, सर्दी-खोकला यांच्याशी जोडतो. काही वेळा सोसायटीमधील स्पर्धांमध्ये सहभाग, प्रवास अशा घटनांनंतरही अशी लक्षणे जाणवतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये झोपेत घुसमट होऊन रुग्ण अचानक उठतो आणि बसल्यानंतर थोडे बरे वाटते. काही जोडप्यांमध्ये शारीरिक संबंधांच्या वेळी छातीत जडपणा, दम लागणे अशी लक्षणे दिसून येतात. या पार्श्वभूमीवर, आपण सर्वानी नियमित स्वरूपात आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. सहज घरी तपासता येणारे म्हणजे वजन, नाडीचा वेग, ऑक्सिजनची पातळी, रक्तदाब व गरजेनुसार साखरेची पातळी. त्यामध्ये एखादा अचानक बदल दिसल्यास डॉक्टरांकडे जाऊन खात्री करावी. 

काही संकेत लक्षात येत नाहीत...आपल्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे काही संकेत आपल्या लक्षात येत नाहीत. उदा. वजनात बदल, पाय सुजणे, विश्रांतीच्या वेळेस हृदयाची गती वाढणे, लघवीची वेळ बदलणे किंवा वारंवार लघवीला जाण्यास वाटणे तसेच रक्तदाबात चढउतार होणे.

सुरुवातीचे ६ तास महत्त्वाचेबहुसंख्य वेळा लोक हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांना अॅसिडिटी समजतात व घरगुती उपाय अथवा औषधांवर अवलंबून राहतात. 'माझं तर सगळं ठणठणीत आहे, मला हृदयविकार कसला?' ही धारणा आपल्यात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळेच डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यात उशीर होतो. माझ्या अनुभवाने बोलायचं झालं तर, हृदयविकाराचा रुग्ण १२ ते २४ तासांनी डॉक्टरांकडे येतो. पण 'गोल्डन अवर्स' म्हणजे सुरुवातीचे ६ तास महत्त्वाचे असतात. लक्षात ठेवा, वेळेवर उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो! 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाnagpurनागपूर