जिल्हा परिषद निवडणुकीवर ६ जुलैला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST2021-07-03T04:06:43+5:302021-07-03T04:06:43+5:30
नागपूर : वाढते कोरोना संक्रमण व ग्रामीण भागातील शेतीची कामे लक्षात घेता, जिल्हा परिषदेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात ...

जिल्हा परिषद निवडणुकीवर ६ जुलैला सुनावणी
नागपूर : वाढते कोरोना संक्रमण व ग्रामीण भागातील शेतीची कामे लक्षात घेता, जिल्हा परिषदेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात यावी, अशा विनंतीसह माजी सदस्य ज्योती शिरसकर यांनी दाखल केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी इतर संबंधित अर्जांसाेबत जोडून सर्व अर्जांवर येत्या ६ जुलै रोजी एकत्रित सुनावणी निश्चित केली.
सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी २९ जून रोजी नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १९ जुलै रोजी मतदान होणार असून, उमेदवारांना ६ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. परंतु, वर्तमान परिस्थिती लक्षात घेता ही निवडणूक घेणे नागरिकांसाठी धोकादायक ठरेल, असे शिरसकर यांचे म्हणणे आहे.