कस्तुरचंद पार्कवर आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST2020-11-26T04:22:00+5:302020-11-26T04:22:00+5:30
------------------------- वैद्यकीय प्रवेशाला अंतरिम संरक्षण नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने युवराज मोरके या विद्यार्थ्याचा एम. बी. बी. ...

कस्तुरचंद पार्कवर आज सुनावणी
-------------------------
वैद्यकीय प्रवेशाला अंतरिम संरक्षण
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने युवराज मोरके या विद्यार्थ्याचा एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमातील प्रवेश २७ नोव्हेंबरपर्यंत सुरक्षित ठेवला. या अंतरिम आदेशामुळे युवराजला दिलासा मिळाला. त्याची नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाकरिता निवड झाली आहे. परंतु, पडताळणी समितीने त्याच्या गोंड-गोवारी अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्राच्या दाव्यावर नोव्हेंबर-२०१९ पासून निर्णय घेतला नसल्यामुळे त्याचा वैद्यकीय प्रवेश अडचणीत आला आहे. परिणामी, त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले.