हेल्दी नागपूर, वेल्दी नागपूर
By Admin | Updated: October 31, 2014 00:47 IST2014-10-31T00:47:40+5:302014-10-31T00:47:40+5:30
आयुर्वेदात हिवाळा बलदायक, आरोग्यदायक काळ सांगण्यात आला आहे. या ऋतूत आहार जसा भरपूर तसेच व्यायामालाही महत्त्व आहे. सूर्यनमस्कार, धावणे, पोटाचे व्यायाम आदी प्रकारातून आरोग्य अबाधित राखले जाते.

हेल्दी नागपूर, वेल्दी नागपूर
आयुर्वेदात हिवाळा बलदायक, आरोग्यदायक काळ सांगण्यात आला आहे. या ऋतूत आहार जसा भरपूर तसेच व्यायामालाही महत्त्व आहे. सूर्यनमस्कार, धावणे, पोटाचे व्यायाम आदी प्रकारातून आरोग्य अबाधित राखले जाते. नागपूरकरांची सकाळ आता व्यायामाच्याच प्रारंभाने होत आहे. शहरातील सर्वच उद्यानांत व्यायामासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. साहजिकच जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत थंडीच्या कडाक्यातही हे चित्र पाहायला मिळणार आहे. हिवाळ््यात प्रत्येकाचे शरीर निरोगी असते. आहारविहारांचे पालन केल्यास हिवाळा निश्चितच आनंददायी ठरू शकतो. म्हणूनच हा ऋतू सर्वांसाठीच हेल्दी अन् वेल्दी असा राहणार आहे. शहरातील विविध उद्यानांमध्ये सूर्य उगवण्यापूर्वीच दाखल झालेल्या नागपूरकरांची आमचे छायाचित्रकार राजेश टिकले यांनी टिपलेली छायाचित्रे.