शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना युद्धातून माघार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:31 IST

आरोग्य यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने शासनाने कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला परवानगी दिली. पण कोरोनाच्या भीतीपोटी आरोग्य कर्मचारी युद्धातून माघार घेत आहेत. उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात येत असले तरी, निम्म्यावर लोक रुजूच होत नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्दे आरोग्य विभागात काम करण्यास कर्मचाऱ्यांचा नकार : नियुक्तिपत्र घेऊन रुजूच होत नाहीत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आरोग्य यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने शासनाने कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला परवानगी दिली. पण कोरोनाच्या भीतीपोटी आरोग्य कर्मचारी युद्धातून माघार घेत आहेत. उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात येत असले तरी, निम्म्यावर लोक रुजूच होत नसल्याचे वास्तव आहे.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) कडून ही पदभरती सुरू आहे. अर्ज आल्याबरोबर रुजू होण्याचे ऑर्डरही दिल्या जात आहेत. उमेदवार ऑर्डर घेऊन जातात पण रुजूच होत नाहीत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १३,३८० बाधित आढळले आहेत. ९,८३५ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. ३५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातही वाढत असलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता शासनाने कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारून सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या पण गृह विलगीकरणाची व्यवस्था नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाला तिथे ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात उभारलेल्या १३ केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहे. परंतु आता परिस्थिती फार गंभीर होत असल्याने आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाचीही चणचण भासत आहे. त्यामुळे शासनाने ‘सीसीसी’साठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका (नर्स), लॅब टेक्निशियन, औषध निर्माण अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी स्टाफ भरण्याची मुभा दिली आहे. त्यांना चांगले मानधनही दिल्या जात आहे. पण कंत्राटी तत्त्वावर कोरोना युद्धात सेवा द्यायला उमेदवार तयार नाहीत. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ३,२३६ वर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ४६० रुग्ण सीसीसीमध्ये आहेत. येथे ७०० बेडची व्यवस्था केली असून, कोरोना रुग्णांवर उपचारही करण्यात येत आहेत.इतकेच झाले रुजूसीसीसीमध्ये २५ बेडमागे एक डॉक्टर, ६ बेडमागे १ परिचारिकाची गरज आहे. विभागाकडे डॉक्टरसाठी ३५९ लोकांना रुजू होण्याचे आॅर्डरही देण्यात आलेत. परंतु ५० लोकच रुजू झालेत. परिचारिकांमध्ये ६३६ उमेदवारांना ऑर्डर दिले. २२८ रुजू झालेत. १२२ लॅब टेक्निशियन्सना रुजू होण्याचे ऑर्डर दिले. ३८ जण रुजू झालेत. औषण निर्माण अधिकाºयांपैकी ९५ जणांना ऑर्डर देऊनही ४३ जण, तर डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या १४७ उमेदवारांना ऑर्डर दिले, त्पैकी ५२ रुजू झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यEmployeeकर्मचारी