बेराेजगार तरुणांसाठी आराेग्य प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:11+5:302021-07-11T04:08:11+5:30
पाटणसावंगी : काेराेनाची संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लस महामारीची शक्यता पाहता पाटणसावंगी (ता. सावनेर) येथील श्री गणेश प्रासादिक ...

बेराेजगार तरुणांसाठी आराेग्य प्रशिक्षण
पाटणसावंगी : काेराेनाची संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लस महामारीची शक्यता पाहता पाटणसावंगी (ता. सावनेर) येथील श्री गणेश प्रासादिक शिक्षण संस्थेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या काैशल्य विकास विभागामार्फत बेराेजगार तरुण-तरुणींना आराेग्यविषयक माेफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमातून तालुक्यात मनुष्यबळ तयार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव सुधीर केदार व प्रकल्प समन्वयक डाॅ. बी. वाय. नांदेकर यांनी दिली.
महामारीची स्थिती लक्षात घेता आराेग्य विभागात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. डाॅक्टरांसाेबत सेवा देणाऱ्या आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. म्युकरमायकाेसिसचे रुग्ण वाढत आहेत. पॅरामेडिकल स्टाफही कमी आहे. या समस्येचा गांभीर्याने विचार करता भविष्यात आराेग्यविषयक समुपदेशन करणाऱ्यांची आणि वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्यांची नितांत गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने समाजाेपयाेगी उपक्रम हाती घेतला आहे. हे प्रशिक्षण बेराेजगार तरुण-तरुणींना जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिले जाणार आहे. सावनेर येथील आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल, दहेगाव येथील शाैर्या मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल व कळमेश्वर येथील पांडे चाईल्ड केअर हाॅस्पिटल येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात १५ ते ४५ वर्षे वयाेगटातील तरुण-तरुणी सहभागी हाेऊ शकतात. प्रशिक्षणार्थींना मानधनही देण्यात येईल, अशी माहिती संस्थेच्या सचिव सुहास केदार यांनी दिली.