भाजयुमोने जाळला आरोग्यमंत्र्यांचा पुतळा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST2021-09-26T04:08:55+5:302021-09-26T04:08:55+5:30
नागपूर : आरोग्य विभागाची वर्ग ‘क’ आणी वर्ग ‘ड’ची होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. या विरोधात शनिवारी भारतीय ...

भाजयुमोने जाळला आरोग्यमंत्र्यांचा पुतळा ()
नागपूर : आरोग्य विभागाची वर्ग ‘क’ आणी वर्ग ‘ड’ची होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. या विरोधात शनिवारी भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरातर्फे मेडिकल चौक येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. गरीब विद्यार्थी आपले पैसे खर्च करून परीक्षा केंद्रावर पोहोचले. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी व पुढील दोन दिवसांत परीक्षेची तारीख निश्चित करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या सर्व गलथान कारभाराला जबाबदार असणारे आरोग्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलन भाजप शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार, शहर महामंत्री दिपांशु लिंगायत, सचिन करारे, मनीष मेश्राम, सारंग कदम, देवदत्त डेहणकर, रितेश राहाटे, विशाल केचे, मंडळ अध्यक्ष अमर धरमारे, सन्नी राऊत, पंकज सोनकर, सचिन सावरकर, संकेत कुकडे, इशान जैन, पीयूष बोइनवार, सौरभ पराशर, आदींनी भाग घेतला.