शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 12:33 IST

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नागपूर : देशात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे. भारतात कोरोनाचा नवा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट सापडला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी माहिती दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही. एकंरदरीत सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येतोय. कोरोनाच्या रुग्णांची नोंद होतेय, कारण नागिरक गर्दी करताहेत, मेळावे भरतायत तसंच राजकीय कार्यक्रमदेखील होत असून इथे लोकं एकमेंकांना भेटतायत. मात्र अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्येत वाढ होत नाहीये. तसेच, लसीकरणही चांगलं झालं असून रुग्ण जास्त नसल्याने फार मोठा विषय नाही. कोरोनाच्या रुग्णांची नोंद पाहता काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात चौथ्या लाटेची शक्यता वाटत नाही, असे टोपे म्हणाले.

तर, बुस्टर डोजबाबत केंद्राने सूचना दिल्या आहे, त्यानुसार बुस्टर डोज नागरिकांना देण्यात येत आहे. ॲंटीबॉडीजची टेस्ट करुन लोकांनी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा असेही आरोग्यमंत्री म्हणाले. 

संभाजीराजेंबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. संभाजीराजेंबद्दल आम्हा सर्वांना आदर आहे. ते पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारीदेखील दिली होती. शरद पवारांशी, आमच्याशी त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत. पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडी यासंदर्भातील निर्णय घेतील.

आशिष जयस्वाल यांनी मंत्र्यांकडून विकासकामांसाठीच्या निधी वाटपात भेदभाव होत असल्याचे म्हटले होते, यावर विचारले असता, जयस्वाल हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मतदारसंघाचा विकास व्हायलाच हवा, ही महाविकास आघाडीची जबाबदारी आहे. आम्ही सर्व मिळून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करून दाखवू, अशी प्रतिक्रिया टोपेंनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे