हेल्थ लायब्ररी....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:40+5:302021-01-17T04:08:40+5:30
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असल्यास आपल्या पायांकडे विशेष लक्ष पुरविणे आवश्यक आहे. प्रदीर्घ कालावधीपासून अनियंत्रित मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्त शर्करा, ...

हेल्थ लायब्ररी....
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असल्यास आपल्या पायांकडे विशेष लक्ष पुरविणे आवश्यक आहे. प्रदीर्घ कालावधीपासून अनियंत्रित मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्त शर्करा, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, वजन, आहार आणि व्यायामाकडे लक्ष न दिल्यास कठीण होऊ शकते. दररोज पायांची काळजी घेतल्यास सर्व त्रासांपासून बचाव होऊ शकतो.
-मधुमेहात पायाच्या समस्येची काळजी का वाढते ?
-मुळत: प्रदीर्घ कालावधीपासून अनियंत्रित मधुमेहामुळे धोका वाढतो. हायपरटेंशन, हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, धुम्रपान, पायांकडे दुर्लक्ष यामुळे समस्या गंभीर होते. पायांना योग्य फिटींगची चप्पल, जोडे वापरणे आवश्यक आहे. पायांच्या नियमित स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात पॅरिफेरल न्यूरोपॅथीमुळे पायात जळजळ होत असल्याची जाणीव होऊ शकते. हे हलक्या जखमांचे कारण बनते आणि संक्रमण झपाट्याने पसरू शकते.
नसांचे नुकसान कसे टाळावे किंवा बिघडण्यापासून कसे थांबवावे?
कृपया आपला रक्तशर्करा निश्चित रेंजमध्ये ठेवा. धुम्रपान टाळा कारण धुम्रपानामुळे पायांना कमी रक्तपुरवठा होतो. स्वस्थ आहाराची निवड करा. त्यात फळ, भाज्या खा आणि साखर, मीठ कमी वापरा. शारीरिकदृष्टीने सक्रिय व्हा. त्यासाठी दररोज २० ते ३० मिनिट जोराने चाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधी घ्या.
डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा ?
-शारीरिक हालचाली दरम्यान पृष्ठभाग, जांघेत आणि पोटऱ्यांवर कॅ्रम्प किंवा पायात जळजळल्यासारखे वाटल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. पायातील संवेदनशीलता संपली असेल किंवा गरम-थंड याची जाणीव होत नसल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क करावा. पायाची त्वचा कापली असल्यास किंवा फाटल्यास तसेच पायांचे केस गळत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. फोड, अल्सर, कॉर्न किंवा अंगठ्याचे नख आतून वाढणे चिंतेचा विषय आहे. बोटांच्या मध्ये फंगल इन्फेक्शनसारख्या अॅथ्लिट फूट किंवा चिलब्लेन्सचा उपचार त्वरित करण्याची गरज आहे.
पायांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
-पायांची रोज स्वच्छता करून चांगल्या पद्धतीने सुकवावे. त्वचा फाटण्यापासून थांबविण्यासाठी दररोज पेट्रोलियम जेलीचा हलका स्तर लावावा. स्वत: पायांचे फोड, कॉर्न हटवू नयेत. पायांची नखे खूप कमी करणे टाळावे. जोड्यात पाय फिट होत नसल्यास डॉक्टरकडून डायबिटीक जोड्यांबाबत माहिती घ्यावी. टोकदार जोडे टाळावे. पायांना अधिक वेळ पाण्यात ठेऊ नये. पायांना कोरडे ठेवावे.
पायांच्या देखभालीसाठी खास टिप्स?
-आपल्या पायांचे रोज निरीक्षण करावे. लाल चट्टे, जखमा, फोड किंवा रंग बदलल्यास त्याकडे लक्ष द्यावे. पायांचे निरीक्षण करण्यासाठी मॅग्निफाईंग ग्लासचा वापरही करू शकता.पायांवर पंख फिरवून संवेदनशीलता प्रभावित झाली नाही हे पाहावे. विना इलॅस्टिकचे पातळ, साफ आणि कोरडे मोजे वापरावे. पायांची बोटे रोज मोडावी आणि टाचांना अधूनमधून हलवावे. यामुळे पायातील रक्तप्रवाह चांगला राहतो. पाय सुन्न होणे, जळजळ झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मधुमेहाचा पायांवर काय परिणाम होतो?
-सुरुवातीला पायातील संवेदनशीलता जाऊ लागते. मोज्यांमुळे झालेला लहान फोड जखमेत बदलतो. त्याकडे लक्ष जाणार नाही असेही होऊ शकते. अनेकदा संक्रमण गँगरीनचे कारण ठरते. शरीराच्या इतर भागात संक्रमण होऊ नये यासाठी गँगरीनमध्ये पाय, पायाचा काही भाग तोडावा लागू शकतो.
चारकोट्स फूट काय आहे?
डायबिटीजमुळे नसांचे नुकसान झाल्यामुळे पायात बदल घडतात. सुरुवात लाल होणे, गरम वाटणे आणि सुज येण्यापासून होते. त्यानंतर पायाची आणि घोट्याची हाडे तुटू लागतात किंवा त्यांचा आकार बदलतो. यामुळे तुमच्या पायांचा आकार ओबडधोबड होऊ शकतो. त्याला रॉकर बॉटम किंवा चारकोट्स फूट म्हणतात.
पायांचा थंडी आणि गरमीपासून कसा बचाव करावा?
-जर मधुमेहामुळे तुमच्या नर्व्हस क्षतिग्रस्त झाली असल्यास पायात जळजळ होत असल्याची जाणीवही होत नाही. अशा स्थितीत गरम रस्त्यावर किंवा थंड्या फरशीवर योग्य पादत्राणांचा वापर करावा. पायांना हिटर किंवा खुल्या आगीपासून दूर ठेवावे. पायांवर गरम पाण्याची बॉटल किंवा हिटींग पॅड ठेवू नये.
...............