१९५ नागरिकांची आराेग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST2021-02-05T04:40:28+5:302021-02-05T04:40:28+5:30

माेवाड : डिगडाेह, हिंगणा येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्या वतीने माेवाड (ता. नरखेड) येथील नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावर ...

Health check-up of 195 citizens | १९५ नागरिकांची आराेग्य तपासणी

१९५ नागरिकांची आराेग्य तपासणी

माेवाड : डिगडाेह, हिंगणा येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्या वतीने माेवाड (ता. नरखेड) येथील नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावर नि:शुल्क राेगनिदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात स्थानिक व परिसरातील गावांमधील १९५ नागरिकांची माेफत आराेग्य तपासणी करण्यात आली असून, यातील ११० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली. शिवाय, १५ तरुणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून दिनकर राऊत, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत, माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे, रवींद्र वैद्य, डॉ. सुधीर साठोणे, दीपक बेले, पुरुषोत्तम बागडे, इस्माईल शेख, रवि माळाेदे, हिराचंद कडू, नामदेव वाडबुधे, मुख्याध्यापक दारोकर, फिरोज दिवाण, पुष्पा लुंगे, रमेश राजगुरु, डॉ. देवके, डॉ. किशोर ढोबळे, डॉ. केतन दागडिया, डॉ. रामटेके, मीना पवार, शामल मेंढे, बी.डी. मांढळे उपस्थित हाेते. या शिबिरात १९५ नागरिकांची शल्य चिकित्सक, बालरोग, अस्थिरोग, नाक, कान व घसा, दंतरोग, नेत्ररोग तज्ज्ञ व अन्य विभागातील वरिष्ठ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यातील ११० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर डिगडाेह, हिंगणा येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये माेफत उपचार केले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. काेराेना संक्रमण काळात सेवा प्रदान करणाऱ्या व्यक्तींचा अतिथींच्या हस्ते गाैरव करण्यात आला. शिबिर यशस्वीतेसाठी लेखराज बोरकर, गोलू डुहिजोड, ललित खंडेलवाल, सुनील चुऱ्हे, दिलीप बनाईत, रमेश जिचकार यांनी सहकार्य केले.

Web Title: Health check-up of 195 citizens