सच्चो सतरामदास मिशनतर्फे आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST2021-03-17T04:09:35+5:302021-03-17T04:09:35+5:30
नागपूर : सच्चो सतरामदास सेवा मिशन, जरीपटकाच्या वतीने बाराखोली, श्रावस्तीनगर, वरपाखड येथे नि:शुल्क आरोग्य व लसीकरण शिबिराचे आयोजन झाले. ...

सच्चो सतरामदास मिशनतर्फे आरोग्य शिबिर
नागपूर : सच्चो सतरामदास सेवा मिशन, जरीपटकाच्या वतीने बाराखोली, श्रावस्तीनगर, वरपाखड येथे नि:शुल्क आरोग्य व लसीकरण शिबिराचे आयोजन झाले. शिबिरात डॉ. राम थारवानी यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. यावेळी ३७७ रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला. यावेळी समाजसेवक घनश्यामदास कुकरेजा, नगरसेवक विक्की कुकरेजा, भावना लोणारे, सुरेश जग्यासी, वेदप्रकाश आर्य, महेंद्र धनविजय, नितिन गोधवानी, विजय के., अमित थारवानी, सानिया, महक थदानी, पूजा मोरयानी, अश्विन डोंगरे, सीमा, रिंकू, कोमल, ऋषिका, अंकित, प्रदीप बालानी उपस्थित होते.
-----------
सिंधी सेवा संगमतर्फे भोजन वितरण
नागपूर : विश्व सिंधी सेवा संगम सेंट्रल नागपूर महिला टीमने टाळेबंदीच्या दुसऱ्या दिवशीही श्रमिक व गरजूंना भोजन व सरबत वितरण केले. यावेळी अध्यक्ष किरण तोलानी, महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप मोटवानी, कोमल खंडवानी, डिंपल खंडवानी, पूनम ठाकूर, साक्षी ठाकूर उपस्थित होते.
------------