ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य शिबिर

By Admin | Updated: June 16, 2016 03:10 IST2016-06-16T03:10:13+5:302016-06-16T03:10:13+5:30

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी, दि. १८ जून रोजी महिला आणि बालकांसाठी ....

Health Camp for the memory of Jyotsna Darda | ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य शिबिर

ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य शिबिर

१८ रोजी आयोजन : लोकमत व जैन सहेली मंडळाचे आयोजन; डॉ.दंदे फाऊंडेशनचे सहकार्य
नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी, दि. १८ जून रोजी महिला आणि बालकांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत-जैन सहेली मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व डॉ.दंदे फाऊंडेशनच्या सहकार्य होणारे हे शिबिर बुटीबोरी येथील श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड वेल्फेअर सेंटर येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान घेण्यात येईल.

या शिबिरात प्रामुख्याने नेत्ररोग, अस्थिरोग, जनरल सर्जरी, मेंदूरोग, मूत्रविकार, प्लास्टीक सर्जरी, कर्करोग, नाक, कान, घसा, स्त्रीरोग, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, जनरल मेडिसीन, त्वचा आणि गुप्तरोग, मनोविकार, श्वसन विकार व क्षयरोग, ग्रंथीचे विकार आदी रोगांची विशेषज्ञांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व रुग्णांची हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, इसीजी, ईईजी, बीएमआय, पीएफटी, पॅप स्मीयर आदींची तपासणीही नि:शुल्क करण्यात येणार आहे.
या शिबिराला या परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात नाव नोंदविण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ, येथे प्रत्यक्ष संपर्क साधता येईल.
यासोबतच दूरध्वनी क्रमांक २४२९३५५, ९९२२९१५०३५, ९८८१७४९३९० आणि ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Health Camp for the memory of Jyotsna Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.