जनसंग्राम फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर
By Admin | Updated: August 14, 2014 01:23 IST2014-08-14T01:23:14+5:302014-08-14T01:23:14+5:30
जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्यातर्फे शहरातील हजारी पहाड, दाभा, गिट्टीखदान, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, सदर, भिवसनखोरी, रामनगर आदी भागात नि:शुल्क

जनसंग्राम फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर
पाच हजारावर रुग्णांना चष्मेवाटप : परिणय फुके यांचा पुढाकार
नागपूर: जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्यातर्फे शहरातील हजारी पहाड, दाभा, गिट्टीखदान, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, सदर, भिवसनखोरी, रामनगर आदी भागात नि:शुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतला़
या शिबिरात डोळ्यांची तसेच संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. ब्लड प्रेशर, शुगर, हाडांची चाचणी व पोटाचे विकार आदींची तपासणी करण्यात आली. रुग्णांना मोफत औषध व आयड्रॉप वितरित करण्यात आले. डोळ्याचे विकार असलेल्यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला तसेच ज्यांना मोतिबिंदू आढळला त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातुन आजवर १२०६ रुग्णांची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली असून ५३२८ रुग्णांना नि:शुल्क चष्मेवाटप करण्यात आले आहे. या शिबिरासाठी डॉ. विकास महात्मे, डॉ. शंतनु सेनगुप्ता व चमूचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन डोये, आशीष मनकवडे, मंगेश तागडे, शेखर मनकवडे आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)