शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाने बायकोला हाताशी धरून केला शासकीय निधीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 21:00 IST

शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानाची रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकाने परस्पर काढून शासकीय निधीचा अपहार केला. विशेष म्हणजे संस्थेमध्ये त्यांची पत्नी कुठल्याही पदावर नसताना सचिव दाखवून बँकेचे सर्व व्यवहार परस्पर केले. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची दिशाभूल करून ६ लाख ८६ हजार रुपये गबन केले.

ठळक मुद्देसंस्थेला मिळणारे वेतनेतर अनुदान परस्पर काढले : अध्यक्ष, सचिवाची केली दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानाची रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकाने परस्पर काढून शासकीय निधीचा अपहार केला. विशेष म्हणजे संस्थेमध्ये त्यांची पत्नी कुठल्याही पदावर नसताना सचिव दाखवून बँकेचे सर्व व्यवहार परस्पर केले. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची दिशाभूल करून ६ लाख ८६ हजार रुपये गबन केले.प्रकरण नवजीवन शिक्षण संस्था रामटेक येथील आहे. संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत किंमतकर व सचिव बाबुराव रहाटे आहेत. २०१५ पासून संस्थेला वेतनेतर अनुदान शासनाकडून प्राप्त झाले. या रकमेच्या चौकशीसाठी संस्थेच्या अध्यक्षांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता अनुदानाची रक्कम युनियन बँकेच्या रामटेक शाखेत जमा केली असल्याचे सांगण्यात आले. युनियन बँकेत चौकशी केली असता कळले की, शाळेचे मुख्याध्यापक अशोक सातपुते हे बँकेचे खाते हाताळत होते. नियमाप्रमाणे वेतनेतर अनुदान हे संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यात जमा व्हायला पाहिजे. परंतु मुख्याध्यापकांनी स्वत:च्या पत्नीला संस्थेच्या सचिव दाखवून, त्यांच्या स्वाक्षरीने खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे बँकेत खाते उघडले. विशेष म्हणजे वेतनेतर अनुदानाचे खाते सुरू करताना शेड्यूल वन जोडणे आवश्यक असते. पण बँकेने चौकशी न करता, खाते उघडले. २०१५ ते २०१९ या कालावधीत या खात्यातून लाखो रुपये काढण्यात आले. मुख्याध्यापक सातपुते व त्यांच्या कुटुंबाने ६,८६,७५७ रुपये गबन केल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत किंमतकर व सचिव हरीशचंद्र रहाटे यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यध्यापकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीGovernmentसरकारfundsनिधीTeacherशिक्षक