शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी वाढली विद्यार्थ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:42 IST

अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तंत्रशिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया काढून आता सीईटी सेल राबवितो आहे. सीईटी सेलने यासाठी कल्प टेक्नॉलॉजिकल प्रा. लि. पुणे या कंपनीला काम दिले आहे. कंपनीने प्रवेशासाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये इतक्या गुंतागुंतीच्या बाबी आहे की विद्यार्थी पुरते गोंधळलेले आहे. सोबतच नेटवर्क मिळत नसल्याने वारंवार सॉफ्टवेअरमध्ये अडचणी येत आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक ते दस्तावेज अपलोड करूनही ते सबमिट होत नसल्याची विद्यार्थी व पालकांकडून ओरड सुरू झाली आहे.

ठळक मुद्देसेतू सुविधा केंद्रातूनही मदत नाही : डॉक्यूमेंट अपलोडिंगची प्रक्रियाही किचकट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तंत्रशिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया काढून आता सीईटी सेल राबवितो आहे. सीईटी सेलने यासाठी कल्प टेक्नॉलॉजिकल प्रा. लि. पुणे या कंपनीला काम दिले आहे. कंपनीने प्रवेशासाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये इतक्या गुंतागुंतीच्या बाबी आहे की विद्यार्थी पुरते गोंधळलेले आहे. सोबतच नेटवर्क मिळत नसल्याने वारंवार सॉफ्टवेअरमध्ये अडचणी येत आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक ते दस्तावेज अपलोड करूनही ते सबमिट होत नसल्याची विद्यार्थी व पालकांकडून ओरड सुरू झाली आहे.कल्प टेक्नॉलॉजिकल प्रा. लि. या कंपनीने या प्रक्रियेसाठी सेतू सविधा केंद्र तयार केले आहे. या सेतू सुविधा केंद्रामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले नाही. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या दस्तावेजाची तपासणी करण्यात येत आहे. पण लिंकच मिळत नसल्याने सेतू केंद्राचे काम सुद्धा ठप्प पडले आहे. यापूर्वी डीटीईतर्फे ही प्रवेश प्रक्रिया राबवित असताना सीईटीचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकली की विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती यायची. आता विद्यार्थ्यांना सीईटीचा निकाल, अप्लिकेशन फॉर्म आणि हॉल तिकीट सुद्धा अपलोड करायचे आहे. त्यानंतर कॅटॅगिरी सिलेक्ट केल्यावर अनावश्यक २५ ते ३० प्रकारच्या डॉक्युमेंटची मागणी करण्यात येत असल्याने पुन्हा विद्यार्थ्यांचा गोधळ उडतो आहे. विशेष म्हणजे २१ जूनपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पाडायची आहे. पण तांत्रिक अडचणी वाढल्याने एकाही विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडलेली नाही. आज दुपारपासून सीईटी सेलने सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने व्हेरीफिकेशन प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही, असे नमूद केले आहे.विशेष म्हणजे सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना माहीत होईल, यासंदर्भात कुठलीही प्रक्रिया राबविली नाही. कुठलेही नोटिफिकेशन, कुठलेही मार्गदर्शन, कुठलीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे विद्यार्थी तोंडातोडीं मिळालेल्या माहितीनुसार प्रक्रिया करीत आहे.तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी त्रस्तत्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोड करताना फाईलचे साईजमध्ये रिस्ट्रीक्शन ठेवले आहे. त्यातही सीईटीचा चार पानाचा अप्लिकेशन फॉर्म लोड करताना त्याचा साईज २५० केबीचा होत आहे. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर सेतू सविधा केंद्रात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेल्यानंतर आणखी वेगवेगळ्या डॉक्युमेंटची मागणी करण्यात येत आहे. त्यातही व्हेरिफिकेशनसाठी सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याने लिंक मिळत नाही. सेतू सुविधा केंद्रातून कुठलेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत नाही.सेतू केंद्रासाठी दिलेले हेल्पलाईन नंबर बंदप्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सेतू सविधा केंद्रासाठी सीईटी सेलने ८६५७५२४६७३ व ८६५७५२४६७४ हे दोन हेल्पलाईन क्रमांक दिले आहे. परंतु दोन्ही हेल्पलाईन क्रमांक डायल केले असता, ते बंद दाखवीत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण