शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'तो' लिफ्टने कॅटरिंगचं सामान घेऊन जाता होता, चॅनल गेटमध्ये डोकं फसलं अन्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 10:47 IST

सुजल हा कॅटरिंगचे सामान घेऊन लिफ्टने जात होता. दरम्यान तो लिफ्टच्या चॅनल गेटमध्ये फसला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. लिफ्ट मॅन नसल्याने तत्काळ घटनेची माहिती होऊ शकली नाही तसेच लिफ्टमध्ये सेफ्टी डोअरही नव्हते.

ठळक मुद्देबालमजुराचा मृत्यू; मंगल कार्यालयाच्या लिफ्टमधील घटनाकार्यालय संचालक दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल

नागपूर : लिफ्टच्या चॅनल गेटमध्ये डोकं फसल्याने एका बाल मजुराचा मृत्यू झाला. ही घटना जगनाडे चौक येथील अनुसया मंगल कार्यालयात घडली. पोलिसांनी मंगल कार्यालय संचालक दाम्पत्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

संघर्षनगर येथील १६ वर्षीय सुजल दिलीपकुमार गुप्ता हा विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाला होता. त्याच्या वडिलाची छोटी दुकान आहे. शाळा बंद असल्याने व कुटुंबीयांची आर्थिक परिस्थती कमकुवत असल्याने, सुजल कॅटरिंगचे ठेकेदार कन्हैय्या पटेल यांच्याजवळ काम करीत होता.

२० नोव्हेंबर रोजी अनुसया मंगल कार्यालयात एक लग्नसमारंभ होते. त्या लग्नाच्या कॅटरिंगचे काम कन्हैय्या पटेल याला दिले होते. सुजल सकाळी ११.३० वाजता कॅटरिंगचे सामान घेऊन लिफ्टने जात होता. याच दरम्यान तो लिफ्टच्या चॅनल गेटमध्ये फसला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. लिफ्ट मॅन नसल्याने तत्काळ घटनेची माहिती होऊ शकली नाही. सुजलला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत चौकशी सुरू केली. चौकशीत कॅटरिंग ठेकेदार व मंगल कार्यालयाच्या संचालकाची निष्काळजीपणा समोर आला. लिफ्टमध्ये सेफ्टी डोअर नव्हते. लिफ्ट मॅनही नव्हता. त्या आधारे नंदनवन पोलिसांनी मंगल कार्यालयाचे संचालक संजय काळे, त्यांची पत्नी जयश्री काळे, मॅनेजर हरीश पिल्ले व कॅटरिंग ठेकेदार कन्हैय्या पटेल याच्याविरुद्ध निष्काळजीपणा बाळगल्या प्रकरणी व बाल न्याय अधिनियमांन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLabourकामगारDeathमृत्यू