किरकोळ वादात डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:12 IST2021-09-07T04:12:16+5:302021-09-07T04:12:16+5:30

नागपूर : रस्त्यात उभी ठेवलेली दुचाकी बाजूला करण्यावरून झालेल्या किरकोळ वादात दगडाने डोके फोडल्याची घटना वाठोडा येथे घडली. अप्या ...

The head broke in a minor argument | किरकोळ वादात डोके फोडले

किरकोळ वादात डोके फोडले

नागपूर : रस्त्यात उभी ठेवलेली दुचाकी बाजूला करण्यावरून झालेल्या किरकोळ वादात दगडाने डोके फोडल्याची घटना वाठोडा येथे घडली. अप्या ऊर्फ पप्पू तागडेने रस्त्यात दुचाकी उभी ठेवून मित्रासोबत गप्पा करीत होता. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने कलीमने त्याला दुचाकी बाजूला करण्यास सांगितले. यावरून वादावादी झाली. शिवीगाळ करीत त्याने दगडाने कलीमवर वार करून डोके फोडले. वाठोडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

.....

जखमी करून मोबाइल पळविला

नागपूर : अंबाझरीतील स्वामी विवेकानंद स्मारक पहाण्यासाठी आलेल्या विजयनगर येथील दीपक सिन्हा (१८) या युवकाला जखमी करून मोबाइल पळविण्याची घटना घडली. या प्रकरणी तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी मंथन संतोष दाबणे (१८), मोहित शंकर पंचेश्वर (२१, तुकडोजी नगर) आणि हिमांशू प्रमोद जंगले (१८, आदर्श कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. दीपक आपल्या मित्रांसह स्मारक पहायला आला होता. दरम्यान, आरोपींनी दंड्याने मारहाण करून त्याचा मोबाइल हिसकावून पळ काढला.

......................

वाडी गुदामात चोरी

नागपूर : वाडी येथील एका गुदामात चोरी करून १.७८ लाख रुपयांचा माल चोरण्यात आला. धरमपेठ येथील आशिष डागा यांची वाडीमध्ये आयकॉनव इंडस्ट्रीज आहे. ४ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात आरोपींनी गुदामाचे कुलूप तोडून १.७८ लाख रुपयांचा माल चोरून नेला. ५ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली. वाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

.............................

Web Title: The head broke in a minor argument