लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या वाहनात खर्रा थुंकताना तोल गेला आणि तरुण वाहनातून खाली रोडवर कोसळला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलालखेडा-मोवाड मार्गावर गुरुवारी (दि. २६) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. (He went to spit and lost his life)प्रफुल्ल बंडू बागडे (२७, रा. पुसला, ता. वरुड, जिल्हा अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रफुल्ल याला खर्रा खाण्याचे व्यसन होते. तो काही कामानिमित्त जामगाव (ता. नरखेड) येथे आला होता. त्याला गावी परत जायचे असल्याने त्याने बोलेरो गाडीतून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तो खर्रा खाऊनच वाहनात बसला होता.खर्रा थुंकायचा असल्याने तो वाहनातून जलालखेडा परिसरातील जिनिंगजवळ डोकावला व तोल गेल्याने रोडवर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला लगेच जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे त्याला डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी जलालखेडा पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.
खर्रा थुंकायला गेला आणि जीव गमावून बसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 08:05 IST
Nagpur News धावत्या वाहनात खर्रा थुंकताना तोल गेला आणि तरुण वाहनातून खाली रोडवर कोसळला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील घटना
खर्रा थुंकायला गेला आणि जीव गमावून बसला
ठळक मुद्देवाहनातून पडल्याने एकाचा मृत्यू जलालखेडा-मोवाड मार्गावरील घटना