शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

तो रिकाम्या गाडीत झोपून होता; अन् ... इंटरसिटी एक्सप्रेसमधील घटना : कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अल्पवयीन मुलगा बचावला

By नरेश डोंगरे | Updated: August 11, 2025 22:14 IST

मात्र, त्याला झोप लागल्याने तो गाडीतच राहून गेला. दरम्यान, ही गाडी देखभालीसाठी अजनी रेल्वे यार्डात पोहोचली.

नागपूर : रेल्वे कर्मचााऱ्यांनी यार्डमध्ये उभी असलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या रिकाम्या कोचला लॉक करताना पुरेशी काळजी घेतल्यामुळे एका अल्पवयीन मुलाचा जीव बचावला. रविवारी अजनीच्या रेल्वे यार्डात ही घटना घडली.

सुहास (नाव काल्पनिक) हा अल्पवयीन मुलगा रागाच्या घरात घरून निघाला आणि इकडे-तिकडे भटकत रेल्वेस्थानकावर आला. तेथून तो ट्रेन नंबर १२११९ इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये बसला. ही गाडी नागपूरला आल्यानंतर सर्व प्रवासी उतरले. मात्र, त्याला झोप लागल्याने तो गाडीतच राहून गेला. दरम्यान, ही गाडी देखभालीसाठी अजनी रेल्वे यार्डात पोहोचली.

तेथे रिकाम्या रॅकला रेल्वे कर्मचारी लॉक करू लागले. तत्पूर्वी त्यांनी प्रत्येक रिकाम्या लॉकची बारकाईने तपासणी केली. यावेळी एका रॅकमध्ये सुहास झोपलेला दिसला. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याला झोपेतून उठवले आणि त्याची विचारपूस केली. भांबावलेल्या या बालकाने घरून निघाल्यानंतर भटकत रेल्वेस्थानकावर आलो आणि चुकीने दुसऱ्याच गाडीत बसल्याचे त्याने सांगितले. त्याची अवस्था बघून कर्मचाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) माहिती दिली. त्यानंंतर सुहासकडून माहिती घेऊन त्याच्या पालकांशी संपर्क करण्याचे आरपीएफ जवानांनी वारंवार प्रयत्न केले. मात्र, तिकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून घेत त्याला शासकीय बालसुधारगृहात पाठविण्यात आले....तर अनर्थ झाला असता

रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुरेशी काळजी न घेता रिकामा रॅक लॉक केला असता तर गाडीच्या कोचमध्ये झोपून असलेल्या सुहासला हवा मिळाली नसती. अर्थात त्याला श्वासोच्छ्वास घेण्यास अडचण झाली असती. मात्र, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे बजावल्याने मोठा अनर्थ टळला.