दंड ठाेठावला, ‘मास्क’ही दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:12 IST2020-11-28T04:12:14+5:302020-11-28T04:12:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस) पथकाने शुक्रवारी मास्क न घालता फिरणाऱ्या १३९ जणांविरुद्ध कारवाई ...

He was fined and given a 'mask' | दंड ठाेठावला, ‘मास्क’ही दिले

दंड ठाेठावला, ‘मास्क’ही दिले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस) पथकाने शुक्रवारी मास्क न घालता फिरणाऱ्या १३९ जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ६९,५०० रुपयाचा दंड वसुल केला. सोबतच मास्क नसलेल्यांना मास्कसुद्धा वापरायला दिले. आतापर्यंत एनडीएसने २१,६१८ नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून ९१.६८ लाखाचा दंडही वसुल करण्यात आला आहे.

शुक्रवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १८, धरमपेठ झोनमध्ये २२, हनुमाननगर झोनमध्ये १६, धंतोली झोनमध्ये ८, नेहरूनगर झोनमध्ये १२, गांधीबाग झोनमध्ये ८,सतरंजीपुरा झोनमध्ये ११, लकडगंज झोनमध्ये १२, आसीनगर झोनमध्ये १६, मंगळवारी झोनमध्ये १५ आणि मनपा मुख्यालयात २ लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मनपाने नाागरिकांना कोविड-१९ च्या दिशा-निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा.

Web Title: He was fined and given a 'mask'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.