शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रोज दारूसाठी तगादा लावणाऱ्या मित्राला त्यांनी पडक्या शाळेत नेले आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 08:45 IST

Nagpur News व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी एका तरुणालाच संपवून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली. ती गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देएमआयडीसीत आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी एका तरुणालाच संपवून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली. ती गुरुवारी सकाळी उघडकीस आली. (He took his friend, who used to fight for alcohol every day, to the school and..) (murder)शुभम आनंद तिलघरे (वय ३०, रा. वाघधरा) असे मृताचे नाव आहे. त्याला दारू आणि गांजाचे भारी व्यसन होते. तो त्याच्या मित्रांना नेहमीच दारू पाजण्यासाठी त्रास देत होता. प्रसंगी हिंसक होऊन मारहाण करत धमकीही द्यायचा. त्याच्या या त्रासाला त्याचे सर्वच मित्र कंटाळले होते. दिवसभर कबाटकष्ट करून रोजी मिळवायची आणि शुभमवर कशाला उडवायची, असे त्यांना वाटत होते. त्याचा नेहमीसाठी बंदोबस्त करायला पाहिजे, असेही त्यांना वाटायचे. मात्र, मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार, अशी त्यांची अवस्था होती. त्यामुळे आरोपी नीलेश उर्फ गजनी शहा, अरून जसवंत सिंग आणि बबलू रामाधर सलोडिया या तिघांनी शुभम तिलघरेला संपवण्याचा कट रचला.नेहमीप्रमाणे शूभम बुधवारी रात्री आरोपींच्या मागे दारूसाठी लागला. आरोपींनी त्याला राजीवनगरमधील दारूच्या भट्टीत दारू पाजली. नंतर त्याला एका पडक्या शाळेच्या आवारात नेले. तेथे दाट झाडंझुडपं वाढली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी तिकडे कुणी फिरकत नाही. आरोपींनी शूभमला तिकडे नेले आणि त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याला ठार मारले. गुरुवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास त्याचा मृतदेह पडून दिसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी आपल्या सहका?्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनीही भेट देऊन माहिती जाणून घेतली. शूभमला रात्री आरोपी नीलेश, अरूण आणि बबलू या तिघांनी सोबत नेले होते, ही माहिती कळताच पोलिसांनी त्यांना शोधले आणि गुरुवारी सायंकाळी अटक केली.भाजी कापायचे चाकू विकत घेतलेआरोपींनी शूभमची हत्या करण्यासाठी तीन चाकू २० - २० रुपयांत विकत घेतले. हत्या करताना आरोपींच्या एका चाकूचे पाते वाकले. प्रारंभी त्याला धाक दाखवून त्याचा नेहमीचा त्रास संपवण्याचा आरोपींचा उद्देश होता. नंतर मात्र त्याला जिवंत सोडले तर तो नशेसाठी आपलाच कुणाचा जीव घेईल, असे आरोपींना वाटले. त्यामुळे त्यांनी त्याची हत्या केली.---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी