पत्नीवर केला चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:05 IST2020-12-07T04:05:22+5:302020-12-07T04:05:22+5:30

नागपूर : मुलास भेटायला आल्यामुळे झालेल्या वादातून आरोपीने आपल्या पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना कळमना भागात घडली. भावना ...

He stabbed his wife | पत्नीवर केला चाकूने वार

पत्नीवर केला चाकूने वार

नागपूर : मुलास भेटायला आल्यामुळे झालेल्या वादातून आरोपीने आपल्या पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना कळमना भागात घडली. भावना अरविंद राजपोपट (४२, रा. जुना कामठी रोड, वाजपेयीनगर, प्लॉट नं. ६४ ), असे पत्नीचे नाव आहे. अरविंद राजपोपट (६४) असे पतीचे नाव आहे. भावना यांचे आरोपी अरविंदसोबत दुसरे लग्न झाले. आरोपी मागील चार महिन्यापासून वेगळा राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शनिवारी ५ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता आरोपी मुलाला भेटण्यासाठी आला होता. मुलाला भेटण्याच्या कारणावरून आरोपीने भावना यांना शिवीगाळ केली. यादरम्यान वाद विकोपाला गेल्यामुळे आरोपीने भावना यांच्या पोटात चाकूने भोसकून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. स्नेहा आशुतोष थेटे (२९ रा. जुना कामठी रोड, वाजपेयीनगर, प्लॉट नं. ६४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०७ , ५०६ (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

..................

Web Title: He stabbed his wife