घराच्या आवारातून बाेकड पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST2021-06-04T04:08:07+5:302021-06-04T04:08:07+5:30

खापरखेडा : घराच्या आवारात बांधलेला बाेकड चाेरट्याने चाेरून नेला. त्या बाेकडाची किंमत १५ हजार रुपये आहे. ही घटना खापरखेडा ...

He ran away from the yard of the house | घराच्या आवारातून बाेकड पळविला

घराच्या आवारातून बाेकड पळविला

खापरखेडा : घराच्या आवारात बांधलेला बाेकड चाेरट्याने चाेरून नेला. त्या बाेकडाची किंमत १५ हजार रुपये आहे. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथे नुकतीच घडली.

सुधाकर दामाेदर साेनेकर, रा. दहेगाव (रंगारी), ता. सावनेर यांनी त्यांच्या घराच्या आवारात नेहमीप्रमाणे त्यांच्या मालकीचा बाेकड बांधून ठेवला हाेता. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात कुणीही नसताना चाेरट्याने ताे बाेकड साेडून चाेरून नेला. सकाळी ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या बाेकडाची किंमत १५ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार गुरुप्रकाश मेश्राम करीत आहेत.

Web Title: He ran away from the yard of the house