शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘घरवाली’ असताना ‘बाहरवाली’ आणली, हटकल्याने आई-बहिणीवरच शस्त्र उगारले

By योगेश पांडे | Updated: December 4, 2023 22:44 IST

अखेर आईला स्वत:च्याच मुलाविरोधात पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपूर : घरात लग्न करून आणलेली पत्नी असतानादेखील एका बाहेरख्याली तरुणाने त्याच्या प्रेयसीला घरी आणले. यावरून त्याची बहीण व आईने प्रेयसीला टोकल्याने संतप्त झालेल्या तरुणाने त्यांच्यावर शस्त्र उगारत घरी राडा घातला. त्याने घरच्याच सीसीटीव्हीचीदेखील तोडफोड केली. अखेर आईला स्वत:च्याच मुलाविरोधात पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.रोहित असे संबंधित तरुणाचे नाव असून तो बेरोजगार आहे. त्याच्या कुटुंबात आई, बहीण, पत्नी आहे. मात्र, तरीदेखील तो बाहेरच्या मुलींशी अनैतिक संबंध ठेवत असतो. त्याला त्यावरून टोकले की तो वाद घालतो. त्याच्या या सवयीला कंटाळून घरच्यांनी त्याला घराबाहेर हाकलले आहे. मात्र, घरी कुणीच नसले की तो मुली घेऊन येतो. काही दिवसांअगोदर तो एका प्रेयसीला घरी घेऊन आला. ही बाब कुटुंबीयांना कळाल्यावर त्यांनी प्रेयसीच्या कुटुंबीयांना या प्रकाराची कल्पना दिली.यावरून आरोपी चिडला व त्याने घरी जात राडा घातला. त्याने त्याची आई व बहिणीवरच शस्त्र उगारले आणि घरच्या वस्तूंची तोडफोड केली. त्याने घरातील सीसीटीव्हीदेखील फोडले. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांना फोन लावला. त्यानंतर आरोपी मुलगा तेथून फरार झाला. त्याच्या आईच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस