शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

सैन्यदलात मेजर असल्याचे सांगून तरुणीला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:37 AM

सैन्यदलात मेजर म्हणून कार्यरत असल्याची थाप मारून लग्नासाठी इच्छूक असलेल्या एका तरुणीला गुजरातमधील एका ठगबाजाने जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने आधी ५० हजार रुपये तिच्याकडून उकळले.

ठळक मुद्देतरुणीला लग्नाचे आमिष५० हजार उकळलेप्रतापनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सैन्यदलात मेजर म्हणून कार्यरत असल्याची थाप मारून लग्नासाठी इच्छूक असलेल्या एका तरुणीला गुजरातमधील एका ठगबाजाने जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने आधी ५० हजार रुपये तिच्याकडून उकळले. नंतर दोन लाख उकळण्याचा प्रयत्न केला. तरुणीला संशय आल्याने तिने चौकशी केली असता आरोपीची ठगबाजी उजेडात आली. त्यामुळे तिने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. मोहित सिन्हा असे ठगबाजाचे नाव असून तो अहमदाबाद (गुजरात) मध्ये राहतो.लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या प्रतापनगरातील प्रीती (वय ३२) हिने जीवनसाथी डॉट कॉमवर आपले प्रोफाईल अपलोड केले होते. तिला तेथे कथित मोहित सिन्हाचे प्रोफाईल दिसले. त्याने स्वत:ला सैन्यदलात मेजर असून हूज (गुजरात) मध्ये कार्यरत असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे प्रीतीने मोहितचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्यासोबत चॅटिंग सुरू केले.आरोपीने प्रीतीला आपल्याला आता पदोन्नती मिळणार असून, कामठीच्या मिलिट्री कॅम्पमध्ये बदली होणार असल्याचे सांगितले आणि तेथे बदली होताच आपण लग्न करू, अशी थाप मारली. १३ मे रोजी त्याचा अचानक तिला फोन आला. निवृत्त सैन्यदल अधिकारी रुषिक बोरा याचा अमरावतीला अपघात झाल्याने पैशाची आवश्यकता असल्याचे सांगून त्याना आपल्या बँक खात्यात तिला २५ हजार भरण्यास सांगितले. पुन्हा १४ मे रोजी २५ हजार जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर १६ मे रोजी मेसेज करून मित्राच्या मुलीचे आॅपरेशन करायचे आहे, असे सांगून तिला दोन लाख रुपये अरविंदसिंग बोहोता याच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.तीन दिवसात वेगवेगळे कारणं सांगून तो रक्कम जमा करण्यास सांगत असल्याने प्रीतीला संशय आला. त्यामुळे तिने आरोपीला फोन केला. मात्र, त्याचा मोबाईल सारखा बंद येत असल्याने त्याने फसवणूक केल्याचे प्रीतीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी