कौटुंबिक वादात त्याने स्वत:ला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST2021-07-22T04:07:45+5:302021-07-22T04:07:45+5:30

मांढळ : पत्नी आणि सासूसोबत भांडण झाले. यानंतर त्याने दोघांना मारहाण केली. पत्नी पोलिसात तक्रार गेल्याचे लक्षात येताच त्याने ...

He ended up in a family dispute | कौटुंबिक वादात त्याने स्वत:ला संपविले

कौटुंबिक वादात त्याने स्वत:ला संपविले

मांढळ : पत्नी आणि सासूसोबत भांडण झाले. यानंतर त्याने दोघांना मारहाण केली. पत्नी पोलिसात तक्रार गेल्याचे लक्षात येताच त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कुही तालुक्यात वग येथे मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. कमलदास नामदेव कामठे (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कमलदास याचे मंगळवारी रात्री ७.३० वाजता दरम्यान कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूसोबत भांडण झाले. यानंतर त्याने दोघींना मारहाण केली. त्यामुळे त्यांची पत्नी मांढळ पोलीस चौकीवर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता कमलदास रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत उतरला. परिसरातील नागरिकांनी त्याला वर येण्यासाठी विहिरीत दोर टाकला. मात्र तो नागरिकांनाच शिवीगाळ करीत होता. बराचवेळ तो विहिरीच्या कडीला धरून तिथे उभा राहिला. यानंतर तो पाण्यात पडला. नागरिकांनी याबाबत मांढळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गळ टाकून त्याचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढला.

Web Title: He ended up in a family dispute