नाेटीस बजावल्यानंतरही घेतला नाही माेबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:09 IST2021-06-09T04:09:47+5:302021-06-09T04:09:47+5:30
नागपूर : नागपूर-जबलपूर महामार्ग क्रमांक ७ आणि नागपूर-सावनेर-पांढुर्णा महामार्ग क्रमांक ६९ च्या कामासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा माेबदला अद्याप जमीन ...

नाेटीस बजावल्यानंतरही घेतला नाही माेबदला
नागपूर : नागपूर-जबलपूर महामार्ग क्रमांक ७ आणि नागपूर-सावनेर-पांढुर्णा महामार्ग क्रमांक ६९ च्या कामासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा माेबदला अद्याप जमीन मालकांनी घेतला नाही. जमिनीसह त्यावर झालेले बांधकाम आणि झाडांचा माेबदलाही त्यांनी घेतला नाही. त्यांना नाेटीस देण्यात आल्यानंतरही माेबदला घेण्यासाठी कुणी समाेर आले नसल्याची माहिती आहे.
रस्त्याच्या बांधकामासाठी त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, प्रशासनाने माेबदला आवंटित करण्यासाठी कार्यक्रमही जाहीर केला आहे. गाव, प्रकरण व सर्व्हे क्रमांकाची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. अधिग्रहण उपजिल्हाधिकारी, संबंधित तालुका कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नाेटीस बाेर्डवर नाेटीस लावण्यात आले आहेत. मात्र कुणीही माेबदला घेण्यास तयार झाले नाही.
स्थिती लक्षात घेता उपजिल्हाधिकारी (अधिग्रहण) यांनी माेबदला वाटपाबाबत आपत्ती किंवा न्यायालयीन प्रक्रिया सुरू हाेत असल्यास त्यांच्या कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयाच्या नाेटीस बाेर्डवर नाेटीस लागण्याच्या १५ दिवसात यासाठी प्रयत्न करावे लागतील. निर्धारित काळात आपत्ती नाेंदविली नाही तर माेबदल्यावरून काही आक्षेप नसल्याचे गृहित धरले जाईल. नाेटीस स्वीकारला नाही तर माेबदल्याची रक्कम संबंधित प्राधिकरणाकडे जमा करण्यात येईल, असेही उपजिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.