पीडितांकरिता ते झाले न्यायदूत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:41+5:302021-01-16T04:11:41+5:30
नागपूर : मूलभूत अधिकार, कायदे, सरकारी योजना याबाबत माहिती नसल्यामुळे समाजातील अनेक जण अन्यायग्रस्त जीवन जगत राहतात. अशा नागरिकांना ...

पीडितांकरिता ते झाले न्यायदूत ()
नागपूर : मूलभूत अधिकार, कायदे, सरकारी योजना याबाबत माहिती नसल्यामुळे समाजातील अनेक जण अन्यायग्रस्त जीवन जगत राहतात. अशा नागरिकांना अधिकारांविषयी जागरूक करण्याचा व त्यांना न्याय मिळवून देण्याचा वसा वकिलांच्या एका समूहाने स्वीकारला आहे. हा समूह थेट पीडितांपर्यंत पोहोचून त्यांना कायदेशीर मार्गदर्शन व इतर आवश्यक मदत करीत आहे. ते पीडितांकरिता न्यायदूत झाले आहेत.
न्यायदूतांच्या या समूहामध्ये ॲड. राजेश नायक, ॲड. आनंद गजभिये, ॲड. प्रफुल्ल अंबादे, ॲड. कैलाश वाघमारे, ॲड. हर्षल लिंगायत, ॲड. भरत टेकाम, ॲड. गौरव गौर, ॲड. शबाना दिवाण, ॲड. विनोद गजभिये, ॲड. नितीन कौटकर आदींचा समावेश आहे. या उपक्रमाकरिता ॲड. नायक यांनी तेजस जस्टीस फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या समूहाचा पहिला कायदेशीर मार्गदर्शनाचा कार्यक्रम तोतलाडोह येथे झाला. तोतलाडोह प्रकल्पाकरिता २५० मच्छिमारांना विस्थापित करण्यात आले. परंतु, त्यांना नवीन ठिकाणी वसवताना कायद्याचे पालन करण्यात आले नाही. त्यांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यात आली, अशी माहिती फाऊंडेशनला मिळाली होती. त्यामुळे फाऊंडेशनच्या पथकाने तोतलाडोह येथे जाऊन मच्छिमारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली. न्यायाचा हा लढा विदर्भातील प्रत्येक पीडित व्यक्तीपर्यंत घेऊन जाण्याचा फाऊंडेशनचा संकल्प आहे.