मिहानमध्ये ‘एचसीएल’ची ५० एकर जागेची खरेदी

By Admin | Updated: September 7, 2016 02:54 IST2016-09-07T02:54:38+5:302016-09-07T02:54:38+5:30

आयटी क्षेत्रातील नामांकित हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेडने (एचसीएल) मंगळवारी मिहान-सेझमध्ये ५० एकर जागा खरेदीचा लीज करार केला.

HCL bought 50 acres of land in Mihan | मिहानमध्ये ‘एचसीएल’ची ५० एकर जागेची खरेदी

मिहानमध्ये ‘एचसीएल’ची ५० एकर जागेची खरेदी

लीज करारावर स्वाक्षरी : आयटी कंपन्यांची रेलचेल
नागपूर : आयटी क्षेत्रातील नामांकित हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेडने (एचसीएल) मंगळवारी मिहान-सेझमध्ये ५० एकर जागा खरेदीचा लीज करार केला. या करारामुळे मिहानच्या विकासात पुन्हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्कील डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी
मंगळवारी सायंकाळी नव्याने करण्यात आलेल्या करारावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील आणि एचसीएलचे उपाध्यक्ष (विधी) विनीत वीज यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या जागेवर एचसीएल स्कील डेव्हलपमेंट सेंटर उभारणार आहे. यापूर्वी एचसीएलने मिहान-सेझमध्ये जागा खरेदीचा करार केला होता. पण जागतिक मंदी आणि तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे पूर्णपणे जागेचा ताबा घेतला नव्हता. पण आता नव्या करारामुळे या कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.
मिहानमध्ये मोठ्या आयटी कंपन्या कार्यरत
भारतातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएस मिहान-सेझमध्ये आधीच कार्यरत आहे. याशिवाय इन्फोसिसने १४३ एकर जागेवर बांधकाम सुरू केले आहे. तसेच टेक महिन्द्रचे बांधकाम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. १० अन्य आयटी कंपन्यांनी काम सुरू केले आहे. काहीच दिवसांपूर्वी पतंजलीने फूडपार्कमध्ये २३० एकर जागा खरेदी केली आहे. भूमिपूजन १० सप्टेंबरला होणार आहे. ही मिहान-सेझसाठी आनंदाची बाब आहे.
करारावेळी ‘एमएडीसी’चे तांत्रिक सल्लागार एस.व्ही. चहांदे, मुख्य अभियंते एस.के. चॅटर्जी, वरिष्ठ अभियंत्या रजनी लोणारे, उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी, कार्यकारी अभियंते ललित इंगळे, विपणन अधिकारी अतुल ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी आणि वीज सल्लागार केशव इंगोले उपस्थित होते.
पाटील यांनी मंगळवारी मिहान-सेझमधील पतंजलीच्या टीसीएस कॅम्पससमोरील जागेची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना भूमिपूजनासाठी येणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: HCL bought 50 acres of land in Mihan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.