लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवसभर कडक उन पडल्यानंतर शनिवारी सायंकाळी अचानक विजांचा कडकडाट होऊन वादळी पावसाने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीची पोलखोल केली. रात्री उशिरापर्यंत वादळ-वारा सुरू होता. वादळामुळे शहरातील बहुतांश भागातील विजेचे खांब व तारा तुटल्या. दीड डझनापेक्षा जास्त झाडे कोसळली. परिणामी बहुतांश भाग अंधारात होता. यामुळे शहरात सर्वत्रच वीज आणि पाणीपुरवठा प्रभावित राहिला.आज शहरात पाणीपुरवठा होणार नाहीशनिवारी आलेल्या वादळी पावसामुळे पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. एमएसईडसीएलच्या लाईनवरून वीजपुरवठा बाधित झाल्याने नवेगाव-खैरी येथून कच्चे पाणी पंपिंग करता आले नाही. खापा, पारशिवनी, मनसर येथील एमएसईडीसीएलचे सबस्टेशनमध्ये मोठा ब्रेकडाऊन झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. परिणामी येथील कच्चे पाणी पंप करून शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रांपर्यंत पोहोचवता आले नाही. ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी सांगितले की, वीजपुरवठा बाधित झाल्याने पाणी पंपिंग करता आले नाही. त्यामुळे रविवार २७ रोजी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र, गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्र, कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणार नाही. दरम्यान महावितरणचे जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर यांनी सांगितले की, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे सर्व अधिकारी कामाला लागले आहे. ५० टक्के वीजपुरवठा सुरळीत झाला असून उर्वरितही केला जात आहे.दीड डझनावर वृक्ष कोसळलेया वादळी पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी जवळपस दीड डझनपेक्षा अधिक झाडे कोसळले. सेंट्रल एव्हेन्यू, वर्धमाननगर चौक येथे झाड कोसळून पडले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली होती. नंदनवन, पडोळेनगर, हिवरीनर, पँथरनगर, विमानतळ परिसर, भांडे प्लॉट चौक, क्रीडा चौक, मानेवाडा, मेडिकल चौक, उदयगर, मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग, तपोवन कॉम्प्लेक्स, शंकरनगर, कळमना, इतवारी, वनदेवीनगर, पिवळी नदी आदी परिसरात झाडे कोसळल्याची माहिती आहे.पडला विजेचा पोल, नागरिकांची तत्परताछोटा ताजबाग ते संजुबा स्कूलकडे जाणाऱ्या