शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:59 IST

उपराजधानीत शनिवारी दुपारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने हाहाकार माजविला. या पावसामुळे काही वेळेपुरते जनजीवन ठप्प झाले. वादळामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यावरील झाडे कोसळली तर विजेचे खांब तुटून पडले. परिणामी हजारो लोकांना विजेचा फटका बसला. मात्र, ४६ अंशावर गेलेल्या तापमानापासून दिलासा मिळाला.

ठळक मुद्देझाडे पडली, विजेचे खांब कोसळले : तापमानापासून दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत शनिवारी दुपारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने हाहाकार माजविला. या पावसामुळे काही वेळेपुरते जनजीवन ठप्प झाले. वादळामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यावरील झाडे कोसळली तर विजेचे खांब तुटून पडले. परिणामी हजारो लोकांना विजेचा फटका बसला. मात्र, ४६ अंशावर गेलेल्या तापमानापासून दिलासा मिळाला. 

शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमरास अचानक जोरदार वादळ आले. वारा ३० ते ४० कि.मी. वेगाने वाहू लागला. त्यामुळे सर्वत्र धूळ उडत असल्याने कुणालाही काहीच दिसेनासे झाले. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना काही क्षण आपली वाहने थांबवावी लागली. लगेचच जोरदार पावसालाही सुरुवात झाली. त्यामुळे लोकांची धावपळ उडाली. वादळी हवेमुळे जाटतरोडी चौकातील विजेचा खांब रस्त्यावर तुटून पडला. छापरूनगर सोसायटी नंबर दोन येथे रस्त्याच्या बाजूला असलेले एक मोठे झाड कोसळून पडले. या दोन्ही वेळी रस्त्यावर कुणीही नसल्याने कुठलही जीवितहानी झाली नाही. शहरातील अनेक भागांमध्ये असेच चित्र होते. त्यासोबतच हिवरीनगर, अंबाझरीपासून तर शहरातील बहुतेक सर्वच भागातील वीज गेली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. 
पारडीत भिंत पडून महिला जखमीपारडीतील भवानीनगर येथे मुन्ना कुंवर नावाचा युवक राहतो. त्याचे घराचे छत टिनाचे आहे. त्याच्या शेजारीच घराचे काम सुरू आहे. अचानक आलेल्या वादळात बाजूच्याच्या घराची भिंत त्याच्या टिनाच्या शेडवर पडली. त्यामुळे घरात असलेली मुन्नाची आई जखमी झाली.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर