शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात पाणी टंचाईमुळे हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 23:05 IST

नागपूर जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आले असून, यात आठ महसूल मंडळाचाही समावेश आहे. ३२ गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टंचाईच्या कामासाठी २५ कोटीची तरतूद केली जात आहे. गावागावात टंचाईवरून ओरड सुरू आहे. अशात सत्ताधारी गंभीर नसल्याची ओरड व्हायला लागली आहे. पाण्याच्या नियोजनासंदर्भातील महत्त्वाच्या बैठका तहकूब होत आहे.

ठळक मुद्देसत्ताधारी नाही गंभीर : महत्त्वाच्या बैठकाही होतात तहकूब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आले असून, यात आठ महसूल मंडळाचाही समावेश आहे. ३२ गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टंचाईच्या कामासाठी २५ कोटीची तरतूद केली जात आहे. गावागावात टंचाईवरून ओरड सुरू आहे. अशात सत्ताधारी गंभीर नसल्याची ओरड व्हायला लागली आहे. पाण्याच्या नियोजनासंदर्भातील महत्त्वाच्या बैठका तहकूब होत आहे. आचारसंहितेची आड घेऊन सत्ता पक्ष जि.प.मधून गायब झाला आहे. त्यावर विरोधकही फक्त प्रतिक्रियांतूनच व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून औपचारिकता सुरू आहे.एकीकडे सरकारचे मंत्री दुष्काळी भागात स्वत: दौरा करून आढावा घेत आहे. पण स्थानिक जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना दुष्काळाच्या बाबतीत गंभीरता अजूनही आलेली नाही. अ‍ॅक्टिव्ह पालकमंत्र्यांचे नियंत्रण असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजपाचे लोकप्रतिनिधी पुरते ढेपाळले आहे. तीन तालुके, आठ महसूल मंडळे दुष्काळाची झळ सोसत असताना दौरे नाही, टंचाईच्या कामाचा आढावा नाही. जलव्यवस्थापनासारखी महत्त्वपूर्ण बैठक तहकूब होत आहे. या बाबीकडे जनता प्रकर्षाने लक्ष ठेवून आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली जि.प. मुख्यालयातून पदाधिकारी गायब झाल्याचेच चित्र आहे. लोकप्रतिनिधींनी कशीबशी सर्वसाधारण सभा आटोपली, त्यात पाणी टंचाईवर विशेष बैठक घेण्याचा निर्णयही झाला. पण तो दिवस अजूनही उजाडला नाही.विरोधक फक्त प्रतिक्रियातूनच व्यक्तदरवेळी सत्तापक्ष व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा विरोधी पक्ष निव्वळ प्रतिक्रियातूनच व्यक्त होताना दिसला आहे. सभेमध्ये हल्ला करणे एवढ्यापुरतीच त्यांची आक्रमकता दिसत आहे. पण रस्त्यावर उतरताना, प्रशासनावर, सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याचे धाडस त्यांनी दाखविलेले नाही. विरोधकच ढेपाळलेले असतील, तर सत्ताधाऱ्यांचा निर्ढावलेपणा सुरूच राहणार आहे. त्याचा फटका ग्रामीण जनतेला बसतो आहे.दोन महिन्यांपासून आढावाच नाहीपदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ कामे सुरू असतीलही. मात्र, समितीच्या सदस्यांना विश्वासात घेऊन कुठे, काय आणि कोणती कामे सुरू आहेत, याचा व्यवस्थित आढावाच मागील दोन महिन्यांपासून घेण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर