शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

पॉर्न व्हिडीओ पाहत करत होते सेक्स अन् प्रेयसी बाथरूममधून येईपर्यंत घडले होते अनर्थ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:08 IST

Crime News : नागपुरातील टेकानाका परिसरात राहणाऱ्या तरुणाचे हबीबनगर, टेकानाका, नागपूर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध हाेते.

ठळक मुद्देसेक्स करण्यासाठी त्यांनी दहेगाव (रंगारी) परिसरातील महाराजा लाॅजमध्ये एक खोली बुक केली. त्या खाेलीत दाेघांनीही माेबाईलवर ‘पाॅर्न क्लिप’ बघितली.

खापरखेडा : ‘पाॅर्न क्लिप’ पाहून सेक्स करणे नागपूर शहरातील एका प्रेमीयुगुलाला जीवघेणे ठरले. यात तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथील एका हाॅटेलच्या खाेलीत गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. नागपुरातील टेकानाका परिसरात राहणाऱ्या तरुणाचे हबीबनगर, टेकानाका, नागपूर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध हाेते. हा २७ वर्षीय तरुण इंजिनिअर असून, बेराेजगार हाेता. ती तरुणी नागपूर शहरातील एका खासगी कंपनीत नाेकरी करते. दाेघेही गुरुवारी सायंकाळी दहेगाव (रंगारी) परिसरात फिरायला आले. सेक्स करण्यासाठी त्यांनी दहेगाव (रंगारी) परिसरातील महाराजा लाॅजमध्ये एक खोली बुक केली. त्या खाेलीत दाेघांनीही माेबाईलवर ‘पाॅर्न क्लिप’ बघितली. त्यांनी त्या ‘क्लिप’मधील पद्धतीने सेक्स करायला सुरुवात केली.

ताे तरुण खुर्चीवर बसला. त्याचे दाेन्ही हात व पाय दाेरीने बांधले हाेते. गळ्यालाही दाेरीने फास बांधला हाेता. सेक्स आटाेपल्यानंतर तरुणी बाथरूमध्ये गेली आणि नियंत्रण सुटल्याने तरुण खुर्चीवरून खाली पडला. त्यातच गळ्याला बांधलेल्या दाेरीचा फास आवळला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ती बाथरूममधून बाहेर येताच हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने लगेच लाॅज व्यवस्थापकाला माहिती दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी त्या तरुणीच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा करीत आहेत.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूरPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हा