शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या टेरीटरीकरिता वनक्षेत्र विकसित केले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:20 IST

विदर्भातल्या विविध वनांमधील वाघांची संख्या वाढली असून, त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करता यावी, याकरिता वनांचा विस्तार करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यासंदर्भातील अर्जाची गंभीर दखल घेऊन ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ला नोटीस बजावली व या मुद्यावर चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन अ‍ॅथोरिटीला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातल्या विविध वनांमधील वाघांची संख्या वाढली असून, त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करता यावी, याकरिता वनांचा विस्तार करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यासंदर्भातील अर्जाची गंभीर दखल घेऊन ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ला नोटीस बजावली व या मुद्यावर चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विकास कामे, उद्योग इत्यादीसाठी वनक्षेत्र वापरल्या गेल्यास नवीन वनक्षेत्र निर्माण करण्यासाठी ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ला निधी उपलब्ध करून दिला जातो. तो निधी नवीन वनक्षेत्र निर्माण करण्यासाठीच खर्च करणे बंधनकारक आहे. उच्च न्यायालयात वन्यजीवप्रेमी सरिता सुब्रमण्यम व घनश्याम ठाकूर यांची वाघांच्या संरक्षणासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. नवीन वाघांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करण्यासाठी पुरेसे वनक्षेत्र नसल्याची बाब लक्षात घेता, या याचिकेत अ‍ॅथोरिटीला प्रतिवादी करण्याची अनुमती मिळावी, याकरिता अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर करून अ‍ॅथोरिटीला या गंभीर प्रश्नावर स्पष्टीकरण मागितले.याचिकाकर्त्यांच्या माहितीनुसार, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातील वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करण्यासाठी टिपेश्वरचे वनक्षेत्र कमी पडत आहे. परिणामी, पाच वाघ टिपेश्वर वनातून बाहेर पडून पांढरकवडा वनक्षेत्रात स्थानांतरित झाले आहेत. पांढरकवडा वनक्षेत्रात वाघांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीवांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते माणसे व पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत. या परिस्थितीत वाघांकरिता वनक्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यासाठी अ‍ॅथोरिटीकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रवींद्र खापरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTigerवाघ