शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

‘हॅशटॅग मी टू’ नागपूरच्या महिलांना केले जागृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 11:28 AM

जागतिक पातळीवर ‘हॅशटॅग मी टू’ ही चळवळ सुरू झाली आणि बऱ्याच महिलांनी त्यांच्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराला जगासमोर मांडले. आपल्या नागपुरातही घरगुती हिंसेच्या २३०३ तक्रारींची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देआणखी हवेत प्रयत्न शहरात घरगुती हिंसेच्या २३०३ तक्र ारींची नोंद

अंकिता देशकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: घरगुती हिंसाचार अधिनियम हा भारतातील स्त्रियांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होय. एक स्त्री विविध भूमिका यशस्वीरीत्या पार पाडते पण तीच स्त्री तिच्या घरात मात्र अनेकदा सुखरूप नसते. आधी अनेक महिला हा कौटुंबिक हिंसाचार सहन करायच्या. परंतु आता जागतिक पातळीवर ‘हॅशटॅग मी टू’ ही चळवळ सुरू झाली आणि बऱ्याच महिलांनी त्यांच्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराला जगासमोर मांडले. आपल्या नागपुरातही घरगुती हिंसेच्या २३०३ तक्रारींची नोंद झाली आहे.भरोसा सेलमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात २०१७ साली, घरगुती हिंसेच्या एकूण २३०३ तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. त्यातील ३२० तक्रारी डोमेस्टिक व्हॅयलेन्स कायद्या अंतर्गत पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आल्या आहेत. तसेच ८८१ महिलांनी तडजोड करून आपल्या संसाराला पुनश्च शुभारंभ केला आहे.उरलेल्या तक्रारींबाबत कायदेशीर उपाय काढण्यात आले. कुणाला संरक्षण दिले तर कुणाचे घरातच पुनर्वसन करण्यात आले.भरोसाच्या समुपदेशक, संगीता ढोमणे सांगतात, 'अनेक कौटुंबिक हिंसेचा परिणाम इतका भंयकर असतो की त्या महिलेला कायमस्वरूपी नैराश्य येऊ शकते. नोंद झालेल्या तक्रारींमध्ये नैराश्याचे प्रमाण ८ ते १० टक्के असे आढळले आहे. असे अनेक प्रसंग येतात जेव्हा समुपदेशन करताना जाणवते की त्या महिलेला त्वरित उपाय हवाय. कौटुंबिक हिंसेने ग्रासलेल्या महिला या फक्त अशिक्षितच असतात असे नाही तर बऱ्यांचदा त्या उच्चशिक्षित, परदेशी राहून शोषण सहन करणाऱ्यां देखील असतात. आजच्या पिढीत कौटुंबिक हिंसेला घेऊन बरीच जागरूकता आलीय. पण कुठे ना कुठे या समस्येला मुळापासून उपटून काढायचं असेल तर शिक्षण हा एकाच मार्ग आहे, असे मत देखील जगताप यांनी मांडले.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस