हरिनामाने गुंजले बोरगांव

By Admin | Updated: September 4, 2014 00:54 IST2014-09-04T00:54:12+5:302014-09-04T00:54:12+5:30

श्रावण मासानिमित्त बोरगांव येथील श्री मारुती देवस्थान ट्रस्ट येथे श्रीमद्भागवत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मागील ६५ वर्षांपासून वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या थाटाने साजरा होत आहे.

Hariamanake Gunjale Borgaon | हरिनामाने गुंजले बोरगांव

हरिनामाने गुंजले बोरगांव

श्रीमद्भागवत कथा महोत्सव : परिणय फुके यांच्या हस्ते पूजा
नागपूर : श्रावण मासानिमित्त बोरगांव येथील श्री मारुती देवस्थान ट्रस्ट येथे श्रीमद्भागवत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मागील ६५ वर्षांपासून वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या थाटाने साजरा होत आहे. या सप्ताहात काकडा, श्रीमद्भागवत कथा, हरिपाठ, हरिकीर्तन दररोजच्या कार्यक्रमाची रूपरेषा असून ह़भ़प़ नारायण महाराज शेंडे, देवी ज्ञानेशाची, ईश्वर महाराज उईके (आळंदी), ह़भ़प़ पांडुरंग महाराज बारापात्रे, नारायण महाराज पडोळे, संतोष महाराज निंबाळकर, संतोष महाराज ठाकरे व डॉ़ रविदास महाराज शिरसाट यांनी भागवत कथेचे वाचन केले. या वेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गोपालकाल्याचे कीर्तन करून महाप्रसाद वितरित करण्यात आला.
सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ़ परिणय फुके यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना व आरती करून श्रीमद्भागवत कथा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली़
या प्रसंगी डॉ़ परिणय फुके म्हणाले, अशा भागवत कार्यक्रमामुळे आज समाज हा एकजुटीने बांधला गेला आहे़ श्रीमद्भागवत सप्ताह कथाच्या माध्यमातून प्रत्यक्षात परमेश्वराचे दर्शन घडत असते़ या वेळी नितीन महाराज वानखेडे, राधेश्याम महाराज साठवणे, ईश्वर महाराज उईके, बबलू महाराज उपासे, अमित करडभजने, निशिकांत टाकळखेडे, प्रमोद चौधरी, अनिल भुसारी, रवि कडू, आकाश ठाकरे, प्रभूजी बाविसताले, घनश्याम जैवार, ज्ञानेश्वर इंगोले, देवीदास ठाकरे, गोवर्धन सडभाके, नानाजी बधणे, राजू इंगोले, निवृत्ती चौधरी, बळवंतराव वानखेडे, भोजराज निंबाळकर, नामदेवराव मते, सुनील धांडे, वासुदेव महाराज, पंढरीजी साबळे, सोपान महाराज, ज्ञानेश्वर महाराज, श्रीराम गिरे, हिंमत बुवा, प्रभाकर भोयर, शंकरराव सपाटे, भाऊराव चोपडे, धनराज पाल, नारायण भांगे, रामकृष्णा गोधनीवाले, हनुमान वानखेडे, संभाजी मारबते, बालचंद्रजी शिंगणे परिवार, मोरुभाऊ बरडे परिवार, नामदेव काळे, मनोहरराव कडू, विजयराव बरडे, राजेंद्रजी दखणे, नितीनजी मोरे, कृष्णा फळके, नारायणराव उगले, रामदासजी इंगोले, कमलाकर चौधरी, शंकरराव सपाटे, प्रवीण ठाकरे, मोरेश्वर रहाटे, देवीदास तिवाडे, संभाजी मारबते, संजय चौधरी, सुधाकर आदमने, आनंदराव गोतमारे, सुरेश आदमने, शरद शिंगणे, ईश्वर काळे, धनराज पाल तसेच सेवाभावी भजन मंडळी वारकरी भजन मंडळ बोरगाव, माऊली महिला भजन मंडळ बोरगांव, हरिओम महिला भजन मंडळ हनुमान मंदिर टेकडी बोरगांव, साईबाबा महिला भजन मंडळ बोरगांव, शिव महिला भजन मंडळ बोरगांव, अनसूया महिला भजन मंडळ गोरेवाडा, एकता महिला भजन मंडळ बोरगाव, गजानन महिला भजन मंडळ, बोरगाव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Hariamanake Gunjale Borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.