शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

निर्ढावलेल्या आरोपीची नागपुरातील पोलीस ठाण्यात भाईगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 21:03 IST

बसचालक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना आरोपी आतमध्ये आला आणि त्याने चक्क पोलिसांसमोरच बसचालकाच्या कानशिलात लगावली.

ठळक मुद्देबसचालकाला ठाण्यातच मारले : सीताबर्डीत घटना, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नलवर उतरण्यास मनाई केली म्हणून एका आरोपीने बसचालकासोबत वाद घातला. एवढेच नव्हे तर बसचालक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना तो आतमध्ये आला आणि त्याने चक्क पोलिसांसमोरच बसचालकाच्या कानशिलात लगावली. सोमवारी सकाळी १०.१० वाजता सीताबर्डी पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. आदित्य युवराज आटोने (वय ३२, रा. साखरे गुरूजी शाळेसमोर,सिंदी खाना गणेशपेठ) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.मनोज वासुदेवराव घोडसे (वय ३२) हे तेलकामठी, कळमेश्वर येथे राहतात. ते राज्य परिवहन महामंडळात बसचालक म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे ते सोमवारी सकाळी १०. १० वाजता सावनेरहून प्रवासी भरलेली बस घेऊन नागपुरात आले. मोरभवनात जात असताना सिग्नल बंद असल्यामुळे त्यांनी झाशी राणी चौकात बस थांबवली. बसमध्ये असलेल्या आदित्य याने सिग्नलवर बसचे दार उघडून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. गर्दी असल्यामुळे आणि आजूबाजूने वाहन येत असल्याने बसचालक घोडसेंनी त्याला मनाई केली. यावेळी आरोपीची बसचालकासोबत बाचाबाची झाली. परिणामी घोडसेने बस थांबवून सरळ सीताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ते पोलीस ठाण्याच्या हॉलमध्ये तक्रार नोंदवित असताना आरोपी आटोने तेथे आला आणि त्याने पोलिसांच्या समोरच घोडसेच्या कानशिलात लगावली. पोलीस ठाण्यात सर्वांसमक्ष सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी आटोनेला कसेबसे आवरले. नंतर त्याला शासकीय कामात अडसर निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटक केली.न्यायालयीन कोठडीत रवानगीआरोपी आदित्य आटोने हा बड्या घरचा असल्याचे समजते. पोलीस ठाण्यात पोलीस असतानाच त्याने हा निर्ढावलेपणा दाखवल्याने काही वेळेसाठी पोलीसही स्तंभीत झाले होते. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आज त्याची न्यायालयीन कस्टडीत रवानगी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे